April 20, 2026 1:49 pm

वयाच्या ६० व्या वर्षी प्रेमात पडलेल्या आमिर खानचा खुलासा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

‘परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खानच्या वैवाहिक आयुष्याविषयी सर्वांना माहितच आहे. बालपणीची मैत्रीण रीना दत्ताशी लग्न मग घटस्फोट, त्यानंतर निर्माती किरण रावसोबत तो विवाहबद्ध झाले. काही वर्षांनी त्यांचाही घटस्फोट झाला. तर आता आमिर तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. वयाच्या ६० व्या वर्षी तो गौरी स्प्रॅटच्या प्रेमात आहे. आता तो गौरीशी तिसरं लग्न करणार असा प्रश्न अनेकदा त्याला विचारला जातो. यावर त्याने मी गौरीशी आधीच लग्न केलं असल्याचा खुलासा केला आहे. नक्की काय म्हणाला आमिर खान?

 

आमिर खान म्हणाला, “गौरी आणि मी एकमेकांसोबत खूप सीरियस आहोत. आमचं नातं मजबूत आहे. आम्ही पार्टनर आहोत आणि सोबत आहोत. लग्नाचं म्हणाल तर मनातून मी गौरीशी आधीच लग्न केलं आहे. आता याला औपचारिक रुप द्यायचं की नाही हे मी येत्या काळात ठरवेन.”

 

आमिर खानने गेल्या वर्षी त्याच्या ६० व्या वाढदिवशी गर्लफ्रेंड गौरी खानला जगासमोर आणलं. तेव्हा सर्वानाच धक्का बसला होता. गौरी आणि आमिर एकमेकांना २५ वर्षांपासून ओळखतात. मात्र गेल्या अडीच वर्षांपासून ते डेट करत आहेत. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर एकटा पडला होता. त्याला जीवनसाथीची गरज होती. अशात त्याचा गौरीची साथ मिळाली. ती त्याला खूप छान समजून घेते असं तो म्हणाला होता. गौरी आणि त्याच्यात १२ वर्षांचं अंतर आहे. गौरीचाही आधी एक घटस्फोट झाला असून तिला एक मुलगाही आहे.

विवाहाची योजना

अजूनही औपचारिक विवाहाची कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही. आमिर म्हणाले आहेत की वयाच्या 60 मध्ये विवाह करणे त्यांच्या मनाला “शोभेचं” वाटेल काय, हे ते अजून ठरवलेले नाही.

कुटुंब आणि पूर्व विवाहाबद्दल

आमिर खान आधी रीना दत्ता आणि नंतर किरण राव ह्यांच्याशी विवाहबद्ध झाले होते, आणि आवर्तून त्यांच्याशी संबंध चांगले ठेवले आहेत.

त्यांच्या मुलांनी या नात्याला समर्थन दिले आहे आणि कुटुंबानेही गौरीशी ओळख करून घेतली आहे, ज्यामुळे हे नातं अधिक गंभीर आणि स्थिर दिसत आहे.

 

आमिर खानचं पहिलं लग्न १९८६ साली रीना दत्तासोबत झालं होतं. त्यांना जुनैद आणि आयरा ही मुलं झाली. १६ वर्षांनी २००२ साली आमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला. यानंतर आमिर पूर्णपणे कोलमडला होता. २००५ मध्ये आमिरने किरण रावसोबत लग्न केलं. त्यांनी सरोगसी पद्धतीने मुलगा झाला. त्याचं नाव आजाद आहे. किरण आणि आमिरचाही १६ वर्षांनी २०२१ साली घटस्फोट झाला. आजही आमिर आपल्या दोन्ही एक्स पत्नींच्या जवळ आहे.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!