July 27, 2026 5:14 pm

स्वच्छ पुणे’चा दावा फोल? सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था; दुर्गंधी, घाण आणि अस्वच्छतेने नागरिक त्रस्त

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे | प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील अनेक सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये घाण, दुर्गंधी, पाण्याचा अभाव, तुटलेली साधनसामग्री आणि अपुरी देखभाल यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिलांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने त्यांची सर्वाधिक गैरसोय होत आहे. अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

मार्केट यार्ड, मंडई, पर्वती, लक्ष्मीनगर, कर्वे रस्ता आणि विठ्ठलवाडी परिसरातील अनेक स्वच्छतागृहे नादुरुस्त असून, पाणी, प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतेचा अभाव असल्याचे पाहणीत आढळून आले. मात्र, नळस्टॉप येथील दत्तक घेतलेले स्वच्छतागृह तुलनेने स्वच्छ असल्याचे दिसून आले.

महापालिकेच्या माहितीनुसार शहरात ६२८ सार्वजनिक स्वच्छतागृहे असून, त्यापैकी येरवडा-वडगाव शेरी परिसरातील २४ स्वच्छतागृहे नादुरुस्त आहेत, तर कोंढवा-उंड्रीतील एक स्वच्छतागृह बंद आहे. नागरिकांनी नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाणीपुरवठा, महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आणि नादुरुस्त स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!