वारंवार होत असलेल्या दर्शनामुळे वनविभागाने,तातडीने पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी .
पारगाव, दि 27. — आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथील दांगटवस्ती परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून, वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, शेतमजूर तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रविवारी (दि. २६) रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक काळूदास दांगट हे कारने दांगटवस्ती येथील आपल्या घरी जात असताना हा प्रकार घडला. माजी सरपंच भरत फल्ले यांच्या ऊसाच्या शेतातून अचानक एक बिबट्या बाहेर आला आणि रस्त्यावरून झेप घेत दुसऱ्या बाजूच्या शेतात शिरला. हा थरारक प्रकार काळूदास दांगट यांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, या व्हिडिओमुळे परिसरात बिबट्याच्या वावराची पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून हा बिबट्या परिसरात वारंवार दिसत आहे. शेतकरी शेतात काम करत असताना तसेच दुचाकी किंवा पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे विशेषतः सकाळी लवकर आणि रात्रीच्या वेळेत नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतात जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबाबतही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. माजी सरपंच भरत फल्ले यांनीही वनविभागाने त्वरित कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.
परिसरात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याला लपण्यासाठी अनुकूल वातावरण मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागाने नियमित गस्त वाढवून पिंजरा लावण्यासह जनजागृती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, शेतात जाताना सावधगिरी बाळगावी आणि बिबट्या आढळल्यास तात्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 14