May 29, 2026 2:37 am

पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करा; गडकरींचा मोठा दावा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नितीन गडकरींचे हे विधान पेट्रोल आणि डिझेलवरील आपले अवलंबित्व दूर करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. इथेनॉल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे सर्वसामान्यांना परवडणारा आणि प्रदूषणमुक्त प्रवास मिळेल, तर आयात कमी झाल्याने देशाच्या पैशांची बचत होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेल हे आपल्या देशातील प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण आहे. परिवहन मंत्री म्हणून, देशात आता इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, बस, ट्रक आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसुद्धा उपलब्ध झाल्याचा त्यांना आनंद आहे. ते म्हणाले की, याचा एक मोठा फायदा असा आहे की आपले शेतकरी आता केवळ अन्न पुरवणारे नाहीत, तर ते देशासाठी ऊर्जा आणि इंधन देखील निर्माण करत आहे.

गडकरींनी स्वतःच्या वाहनाचा दाखला देत सांगितले, “आज मी चालवलेले वाहन १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालते. इथेनॉलचा सध्याचा भाव ६५ रुपये प्रति लिटर आहे. विशेष म्हणजे, हे वाहन धावताना ६० टक्के वीजदेखील निर्माण करते.” मंत्री गडकरी म्हणाले की, ते गेल्या दीड वर्षांपासून हे वाहन वापरत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत, गाडी चालवण्याचा प्रत्यक्ष खर्च केवळ २५ रुपये प्रति लिटर येतो. हे इंधन स्वस्त, पूर्णपणे स्वदेशी असून प्रदूषण न करता आयात कमी करते. ते म्हणाले की, अशा फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असलेली वाहने लवकरच मोठ्या प्रमाणावर बाजारात आणली जातील.

गडकरींनी असेही सांगितले की, यावर्षी पर्यावरण दिनानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मारुती सुझुकी आपली १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहने सादर करणार आहे. सध्या टोयोटा, टाटा, महिंद्रा आणि सुझुकीसह एकूण १२ कंपन्यांनी अशी वाहने बाजारात आणली आहे. दुचाकी वाहनेही बाजारात दाखल झाली आहे.

गडकरींनी लोकांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, आपण आपल्या इंधनापैकी ८७ टक्के इंधन इतर देशांकडून आयात करतो. या आयात केलेल्या इंधनामुळे देशातील प्रदूषण तर वाढतेच, शिवाय आपली आयातही लक्षणीयरीत्या वाढते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!