May 29, 2026 2:37 am

भर दिवसा बँड्रा स्टेशनवर महिलांच्या डब्ब्यात तरुण शिरला अन्.

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईत लोकल ट्रेननं प्रवास करणं काही सोपं काम नाही. अन् त्यात जर का तुम्ही गर्दीच्या वेळा प्रवास करत असाल तर मग काय विचारायलाच नको. कारण ट्रेनला इतकी प्रचंड गर्दी असते की मुंगीलासुद्धा पाय ठेवायला जागा मिळत नाही.

अशा स्थितीत लोकं बसण्यासाठी नाही तर चक्क उभं राहण्यासाठी सुद्धा हाणामारी करतात. मुंबई लोकलनं प्रवास करणं काही सोपं काम नाही. दर मिनिटाला हजारो प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात. त्यामुळे अर्थातच या प्रवाशांमध्ये धक्काबुक्की किंवा भांडणं वगैरे होणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण सध्या एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे यामध्ये महिलांच्या डब्ब्यात चक्क तरुण चढलाय..लोकलमधील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तु्हीच सांगा यात नेमकी चूक कुणाची ?

वांद्रे येथे एका नराधमाने महिलांच्या डब्यात जबरदस्तीने प्रवेश केला. डब्यातून प्रवास करणाऱ्या भयभीत महिला प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, महिलांनी १५१२ या हेल्पलाईनवर फोन करण्याचा प्रयत्न केला, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी तातडीने डब्याचे इमर्जन्सी टॉकबॅक युनिट वापरण्याचा प्रयत्न केला, पण ते पूर्णपणे बंद आणि अकार्यक्षम होते. प्रवाशांनी सांगितले की, त्यांच्या संरक्षणासाठी आत किंवा जवळपास कुठेही आरपीएफ कर्मचारी उपस्थित नव्हते. पश्चिम रेल्वेचे महिला सुरक्षेचे मोठे दावे निव्वळ ढोंग आहेत. प्रवाशांनी सांगितले की, किंग्ज सर्कल येथे आरोपीने बाहेर पडण्यासाठी एका महिला प्रवाशाला हिंसकपणे ढकलले आणि तो निसटला.

आधीच महिलांनाही धड उभं राहायला जागा दिसत नाहीये अशातच हा तरुण चढल्यानं महिला आरडा-ओरडा करु लागल्या. तरुण ालाखाली उतरा असं सगळ्या माहिला सांगत आहेत मात्र तो खाली उतरण्यास तयार नाहीयेत. काही महिला घाबरलेल्याही दिसत आहेत मात्र तरीही तो तरुणडब्याच्या आतमध्ये शिरताना दिसत आहेत. अशाप्रकारे पुन्हा एकदा महिला डब्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला दिसत आहे. यामुळे विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार असा सवाल सगळे करत आहेत.

लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्यातून पुरुष प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र असे असतानाही पुरुष प्रवाशांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) प्रयत्न केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी वाशी ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर पहाटेच्या सुमारास लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या एका मुलीचा विनयभंग करण्यात आला होता.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!