May 28, 2026 10:57 pm

तरुणासह कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ केला व्हायरल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बारामती शहरातील खंडोबानगर भागात पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबावर पाच जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. कोयता, लोखंडी गज व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. इतकेच नाहीतर भांडण सोडवण्यास आलेल्या फिर्यादींच्या पत्नीचा विनयभंग या नराधमांनी केला. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे,आरोपींनी या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत परिसरात दहशत माजवली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असून पोलिसांचा गुंडांवर धाक उरला आहे की नाही,असा संतप्त सवाल आता बारामतीकर विचारत आहेत. या गुंडांवर पोलीस काय कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रशांत गोरे, आर्यन गोरे, गौरव गोरे, श्रवण गोरे आणि ऋषिकेश गुळवे अशी हल्लेखोरांची नावे आहेत. या हल्लेखोरांनी खंडोबानगर भागात राहणाऱ्या नकुल वाल्मीकी नावाच्या तरुणावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला. नकुल वाल्मीकी (वय २४) व त्यांच्या कुटुंबीयांवर प्रशांत गोरे, आर्यन गोरे, गौरव गोरे, श्रवण गोरे आणि ऋषिकेश गुळवे यांनी कोयता, लोखंडी गज व काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला.भांडण सोडवण्यास आलेल्या फिर्यादींच्या पत्नीचा विनयभंगही करण्यात आला.याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!