या अभियानात समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी “प्लास्टिकचा वापर टाळा”, “कापडी पिशवी वापरा”, “पर्यावरण वाचवा”, “प्लास्टिकमुक्त गाव घडवा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांनी नागरिकांना प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम समजावून सांगत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन केले.
अभियानादरम्यान व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांनाही विशेष संदेश देण्यात आला. वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी प्लास्टिक पिशवीचा आग्रह धरू नये, तसेच व्यापाऱ्यांनी प्लास्टिक पिशव्या देणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर प्रोत्साहन द्यावा, असे आवाहन करण्यात आले. गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत झाली असून, गावात प्लास्टिकमुक्तीची चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजप पदवीधर आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल गव्हाणे, महात्मा फुले विचारमंचाचे पदाधिकारी कैलास नरके, ॲड. सुरेश भुजबळ, सरपंच रोहिणी तोडकर, कमल भुजबळ, पोपट भुजबळ, सुनील ढमढेरे, ॲड. महेंद्र गवारे, शहाजी ढमढेरे, मिनीनाथ ढमढेरे, जगदीश ढमढेरे, ग्रामविकास अधिकारी चेतन वाव्हळ, लक्ष्मण नरके, वसंत भुजबळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानातून तळेगाव ढमढेरेने पर्यावरण संरक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल उचलत “प्लास्टिकमुक्त गाव – स्वच्छ गाव” हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविला.










