June 5, 2026 7:37 am

नाशिक पाणी कपात: शनिवारी ‘या’ ४ प्रभागांत पाणी का नसणार?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सातपूर विभागात शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासून सुरू होणाऱ्या जलवाहिनीला मोतीवाला महाविद्यालय परिसरात गळती सुरू आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी केले जाणार असल्याने सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागातील चार प्रभागात शनिवारी पाणी पुरवठा होणार नाही.

महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. रस्त्यांच्या खोदकामामुळे सध्या अनेक ठिकाणी जलवाहिनी बाधित होत असून नागरिकांना अकस्मात टंचाईला तोंड द्यावे लागते. या घटनाक्रमात शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून सातपूर आणि नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीची नव्याने भर पडली. ध्रुवनगर येथील मोतीवाला महाविद्यालय येथे या वाहिनीची गळती सुरू असून दुरुस्तीचे काम तातडीने करावे लागणार आहे. शनिवारी हे काम केले जाणार आहे. त्यामुळे सातपूर व नाशिक पश्चिममधील चार प्रभागातील अनेक भागात शनिवारी पाणी पुरवठा होणार नाही. रविवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे महापालिकेने म्हटले आहे.

शनिवारी पाणी पुरवठा न होणाऱ्या प्रभागात सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठमधील सावरकरनगर, नरसिंहनगर, दाते नगर, आनंदवल्ली, नवश्या गणपती मंदीर परीसर, बेंडकुळे नगर, गंगापूर गांव, सोमेश्वर कॉलनी, खांदवेनगर, सदगुरुनगर, सुयोग कॉलनी आणि काळेनगर परिसराचा समावेश आहे. तसेच प्रभाग नऊमधील रामेश्वर कॉलनी, श्रमिकनगर परीसर, गंगासागर नगर, शिवाजीनगर, अहिल्याबाई होळकर चौक, धर्माजी कॉलनी, जिजामाता कॉलनी, शिंदोरी रस्ता परीसर, कडेपठार चौक, छत्रपती संभाजी नगर व धृव नगर परीसर. प्रभाग क्रमांक १० मध्ये अशोकनगर जलकुंभ परीसर, जाधव संकुल, सुला चौक ते पपया नर्सरी चौक, मौले हॉल, अंबिका स्विट मागील आदी भाग. नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील नहुष सोसायटी परिसर, माणिकनगर, अरिहंत नर्सिंग होम परिसर, डॉन बास्को, तिरुपती टाऊन परिसर, तेजोप्रभा कॉलनी, श्रमिक कॉलनी, दादोजी कोंडदेव नगर, आयचितनगर, चैतन्यनगर, सहदेव नगर, पंपिग स्टेशन, गीतांजली सोसायटी, रामराज्य जलकुंभ परीसर, पूर्णवादनगर, आकाशवाणी टॉवर, सुयोजित गार्डन, शांती निकेतन आदी परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. या सर्व भागात रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

पावसाळ्याआधी महापालिकेकडून शहरात वेगवेगळी कामे करण्यात येत आहेत. पाणी पुरवठ्यासंदर्भात अनेक प्रभागांमधून नागरिकांच्या तक्रारी असल्याने त्यांचीही दखल घेतली जात आहे. कुठे जलवाहिनी गळती, कुठे व्हाॅल्व्हमध्ये बिघाड असे प्रकार होत असल्याने त्यांची दुरुस्ती केली जात आहे. त्यासाठी अधूनमधून पाणी पुरवठा बंद करावा लागत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!