May 14, 2026 3:04 pm

‘सर, मॅडम म्हणू नका, त्यांना तुमची मुलगी समजा’, आयुक्तांचे डोळे पाणावले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भोर तालुक्यातील नसरापूर येथे माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना घडली. सोमवारी (दि. ४) पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी पीडितेच्या घरी जात तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कधीही माझ्याशी काही बोलायचे असेल, तर मला सांगा, मी तुमच्या घरी येईल, असे आश्वासन देताना पोलिसआयुक्तांचे डोळे देखील पाणावले होते.

१ मे रोजी ही घटना घडल्यानंतर, शनिवारी (दि. २) संतप्त नागरिकांनी नवले पूल परिसरात साडेचार तास आंदोलन केले होते. या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडितेच्या वडिलांना तुमच्या मागण्या आम्ही नक्की पूर्ण करू, असे मुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिले होते. दरम्यान, सोमवारी पोलिस आयुक्तांनी पीडितेच्या आई-वडिलांना धीर देत, या प्रकरणासाठी लवकरच विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाईल, असेही सांगितले.

नसरापूर येथे नराधमाने चिमुरडीला गोठ्यात ‘वासरू दाखवतो’ असे म्हणत नेले. त्यावर बोलताना पीडितेच्या वडिलांनी तिला गाय आणि वासरू खूप आवडायचे. दोन दिवसांपूर्वीच एका गायीला वासरू झाल्याने ती गोठ्याकडे गाय आणि वासरू बघण्यासाठी गेली, असे उद्विग्न मनाने पोलिस आयुक्तांना सांगितले.

दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर पीडितेचे कुटुंबीय अत्यंत दु:खात असून, दोन दिवस पीडितेच्या आई-वडिलांनी अन्नाचा एकही घास खाल्लेला नव्हता. पीडितेची आई चिमुरडीचा फ्रॉक हातात धरून दिवस-रात्र रडत आहे. ही बाब पोलिस आयुक्तांना समजताच त्यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांना आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यांची खासगी रुग्णालयात नेऊन योग्य ती तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान, घरातून निघताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पीडितेच्या आईला धीर देत, ‘मॅडम, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आरोपीला फाशीची शिक्षा होईल,’ असे म्हणत हात जोडले. यावर कुटुंबीयांपैकी एका महिलेने, ‘सर, मॅडम म्हणू नका, त्यांना तुमची मुलगी समजा’ असे म्हटले. या वाक्यानंतर पोलिस आयुक्त देखील काही वेळ स्तब्ध झाले. त्यानंतर एकही शब्द न बोलता ते हात जोडून घरातून बाहेर पडले.

नवले पूल येथील आंदोलनानंतर सोशल मीडियावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची ओरड सुरू झाली. त्यावर पीडितेच्या कुटुंबीयांनी एका व्हिडिओद्वारे, नवले पूल परिसरात जे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये सगळं शांततेत चालू असताना नंतर काही गोष्टी फारच चिघळल्या. परंतु, त्यामध्ये वेगळं असं काही झालं नाही. आमच्या ज्या काही मागण्या होत्या आणि पोलिसांचं जे काही म्हणणं होतं, त्यानुसार आपण त्याचा एक समन्वय साधला होता, त्यानंतर आंदोलनाची समाप्ती केली होती. दरम्यान, महामार्गावर मोठी वाहनांची रांग लागली होती, त्यामध्ये ॲम्ब्युलन्स वगैरे होत्या, त्यामध्ये अनेक जीव अडकले होते. परंतु, आता सोशल मीडियामध्ये आपण जे काही बघतोय, त्यामध्ये असं खूप काही निगेटिव्ह सांगितले जातंय की वडिलांना कॉलर धरून उठवलं किंवा हे आंदोलन हाणून पाडलं वगैरे. तर असं काही झालं नाहीये. सर्व जे काही समाजबांधव असतील, जे काही तिथे जमलेले सर्व लोक होते, यांनी अत्यंत छान पद्धतीने हे आंदोलन केलं होतं. जे काही नंतर थोडंफार झालं हे काही समाजकंटक असतील त्यांच्यामार्फत त्या घटना घडल्या होत्या. पण अत्यंत उत्तम सपोर्ट केला सगळ्यांनी केला आणि त्या सगळ्यांचे मी पीडितेच्या वडिलांच्या वतीने आभार मानतो. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून एकच सांगणं आहे की, तुम्ही वैयक्तिक यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर त्या नराधमास फाशीची शिक्षा सुनवावी.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!