May 14, 2026 3:47 pm

डॉक्टर महिला घरात एकटी, ओळखीच्या तरूणाकडून बलात्कार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

डॉक्टर महिला घरात एकटी असताना एका ओळखीच्या तरुणाने बलात्कार केला. त्या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून ते महिलेच्या मोबाईलवर पाठवले. त्यानंतर त्याने ते डिलीट करण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी केली.

या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन संशयित शक्ती विक्रम भोसले (वय २८, रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली.

न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला ३० एप्रिलला दुपारी तीन वाजता घरात एकटीच असताना शक्ती भोसले येथे आला. त्यानंतर घटनाक्रम घडला. या प्रकाराने धक्का बसलेल्या पीडिताने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांचे तोंड दाबून धरत त्याने वाच्यता केल्यास पतीसह पीडिताला ठार मारण्याची धमकी दिली.

मानसिक धक्का बसलेली महिला दोन दिवस घरातून बाहेरही पडली नाही. त्यानंतर शक्ती भोसलेने एक मे रोजी रात्री ११ वाजता पीडित महिलेच्या मोबाईलवर तो व्हिडिओ टाकला. शक्तीने फोन करून हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एक लाखाची मागणी केली. त्यानंतर शनिवारी (ता. २) पीडिताने याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!