April 27, 2026 3:54 pm

गड किल्ले संवर्धन संस्थेचा १० वा वर्धापन दिन साजरा.

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दि.(२६) ऐतिहासिक किल्ले सिंहगड येथे गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य यांचा १० वा वर्धापन दीन किल्ले सिंहगड येथे साजरा करण्यात आला होता.किल्ले सिहगड हे शौर्यचे , बलीदानाचे प्रतिक आहे या.शुरवीराना वंदन करून गड किल्ले संवर्धन संस्थेने सुरुवात किल्ले सिंहगड साक्ष, शपथ घेऊन सुरुवात केली होती.

आज दहा वर्षे गड किल्ले जतन, संवर्धन, साफसफाई स्वच्छता, शिवकार्य करुन यशस्वी वाटचाल करत आहे.या वर्धापन दिनानिमित्त सकाळी नरवीर तानाजी मालुसरे स्मारक वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांची सजावट केली होती.

सकाळी नऊ वाजता किल्ले सिंहगड अमृतेश्वर मंदिर, छत्रपती राजाराम महाराज समाधी ,कोढाणेश्रर मंदिर इत्यादी गडदैवताचे पुजन करण्यात आले.दुपारी १२नंतर किल्ल्यावर उपस्थित पर्यटक, शिवभक्तांना थंडगार कोकम सरबतचे वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवरायांचे गड किल्ले चांगले राहिले पाहिजे गडावरील वास्तूंचे जतन, संवर्धन, संरक्षण झाले पाहिजे पुढील पिढीला श्री छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान इतिहास समजावा यासाठी गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्रातिल विविध भागातील गड किल्ल्यांवर जाऊन महिन्यांतील एक दिवस जाऊन साफसफाई, स्वच्छता मोहीम राबवली जाते. यासाठी संस्थेचे पुणे, मुंबई, कोकण, सिंहगड विभाग कार्यरत आहे.

या कार्यक्रमाला वनविभागाचे श्री. बळीराम वायकर,प.स.सदस्य श्री.दत्ता जोरकर, सरदार घराणे श्री.संतोष डिंबळे सर पाटिल,श्री.नितिन गोळे,शाहिर संभाजी डिंबळे पुरातत्व विभाग कर्मचारी ,स्थानिक ग्रामस्थ विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवभक्त उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन शांताराम लांघे, विजय साळेकर,मोसीम मुल्ला, जीवन बराटे, श्रीनाथ घाडी,सौरभ शिंदे यांनी केले.अशी माहिती संस्थेचे संस्थापक साईनाथ जोशी यांनी दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!