April 27, 2026 3:52 pm

‘सदा रडते… आधी स्वतःचे डोलणारे बैल सांभाळा…’ मनसेने सदावर्तेंची उडवली खिल्ली!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपल्या खास आक्रमक शैलीत चोख प्रत्युत्तर दिले आहे.

ठाण्यातील वर्दळीच्या नितीन कंपनी चौकात मनसेच्या वतीने एक उपहासात्मक व्यंगचित्र लावण्यात आले असून, यात वकील गुणरत्न सदावर्ते यांची खिल्ली उडवत त्यांना ‘सदा रडते’ असे संबोधण्यात आले आहे. या लक्षवेधी बॅनरबाजीमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्य शासनाने परिवहन विभागामार्फत रिक्षाचालकांना नवीन परवाना मिळवण्यासाठी मराठी भाषा येणे अनिवार्य केले आहे. या निर्णयाचे राज्यभरातील मराठी नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांनी याला कडाडून विरोध करत परप्रांतीय रिक्षाचालकांची बाजू घेतली होती. त्यांच्या या भूमिकेला उत्तर देण्यासाठी मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.

या व्यंगचित्रात दोन भाग स्पष्टपणे दर्शवण्यात आले आहेत. डाव्या बाजूला ‘सरकार’च्या हातातील खेळणे किंवा बाहुले म्हणून गुणरत्न सदावर्ते (ज्यांचा उल्लेख ‘सदा रडते’ असा केला आहे) यांना दाखवण्यात आले आहे. त्यांच्या मागे सामान्य मराठी बांधव मारण्यासाठी धावत आहेत असे दाखवण्यात आले आहे तसेच , “आधी स्वतःचे डोलणारे बैल सांभाळा” असा खोचक टोला त्यांना लगावण्यात आला आहे. तर उजव्या बाजूला, रिक्षा आणि भगवे झेंडे घेतलेल्या मराठी बांधवांसोबत स्वतः अमित ठाकरे ठाम उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे तसेच “मराठी भाषेचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान..” अशी ठाम गर्जना पाहायला मिळते.

बॅनरच्या खाली “मराठी सक्तीला विरोध करणाऱ्यांना आमचा तीव्र विरोध” असा स्पष्ट आणि थेट इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात राहायचे आणि व्यवसाय करायचा असेल, तर मराठी भाषा यायलाच हवी, या मनसेच्या मूळ भूमिकेशी सुसंगत असा हा फलक आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनीही नुकतेच मराठीच्या सन्मानाबाबत ठाम भाष्य केले होते. या सर्व घडामोडींमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, पुढील काही दिवसांत यावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

स्वप्निल महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग, मनसेसदावर्ते यांनी आपली कुवत ओळखून बोलावे, मराठी माणसाच्या नादी लागल्यास मनसे त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य तो धडा शिकवेल. या आक्रमक पावित्र्यामुळे हा भाषिक वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!