उच्च पदावर काम करण्याची इच्छा अनेकांना असते. चांगल्या पदावर काम करण्यासाठी खूप अभ्यास आणि मेहनत करावी लागते.हा प्रवास अनेकदा खडतर असतो.परंतु कितीही खडतर असला तरीही तो पूर्ण करायचा असतो. असंच काहीसं शरण कांबळे यांनी केलं. त्यांनी एकदा दोनदा नव्हे तर सलग तीन वेळा यूपीएससी परीक्षा पास केली.
सोलापूरचा लेक झाला IPS
शरण कांबळे हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील ताडवाले या गावचे रहिवासी. त्यांचा जन्म गरब कुटुंबात झाला. त्यांच्या आईवडिलांनी खूप खडतर परिस्थितीतून मुलांना शिकवले. त्यांचे वडील मजुरी करायचे. आई भाज्या विकायची. आर्थिक परिस्थितीती बेताची असतानाही त्यांनी मुलांच्या अभ्यासात कोणतीच कसर सोडली नाही
शरण यांचे सुरुवाती शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाली. १०वीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांना खूप मेहनत करावी लागली. रोज गावापासून १२ किलोमीटर दूर चालत जायचे. त्यांच्या गावात वीजदेखील नसायची.अशा परिस्थितीत त्यांनी अभ्यास केला.
शरण यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून बी.टेक पूर्ण केले. यानंतर प्रतिष्ठित संस्था IISc मधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी महाराष्ट्र स्कॉलरशिपदेखील मिळवली होती. त्यांना या पैशांमुळे खूप मदत झाली.
तीन वेळा UPSC क्रॅक
इंजिनियरिंग झाल्यानंतर शरण कांबळे यांना एका कंपनीत २० लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. परंतु त्यांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचे होते. त्यांनी यासाठी २० लाख पगाराची नोकरी सोडली. त्यांनी सलग तीन वेळा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी आयपीएस होण्याचा ऑप्शन निवडला. त्यांच्या या यशामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळाली आहे.











