June 5, 2026 3:10 pm

100 जणांना घेऊन जाणाऱ्या वऱ्हाडाच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पालघर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघातझाल्याची घटना घडली आहे. वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झाला.

यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मृत्यूच आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. पालघरच्या धानीवरी येथे वऱ्हाडाची ट्रक आणि कंटेनर मध्ये हा भीषण अपघात झाला. वऱ्हाडाच्या ट्रक मध्ये 100 पेक्षा जास्त वऱ्हाडी असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वीस ते पंचवीस जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, एकाच वेळी तब्बल 12 जणांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!