June 5, 2026 1:58 pm

चुकीच्या धोरणांचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, दि. १८ मे २०२६ : वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती तसेच शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि NEET पेपर फुटीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ समाजवादी पार्टी, पुणे शहर यांच्या वतीने आज कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये प्रतीकात्मक स्वरूपात चुलीवर स्वयंपाक करून इंधन दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच NEET पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत सामान्य जनतेवरील वाढत्या आर्थिक भाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

यावेळी समाजवादी पार्टीचे पुणे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर म्हणाले की, इंधन तुटवडा व सातत्याने वाढणारे इंधन दर हे सरकारच्या अपयशी धोरणांचे परिणाम आहेत. इंधन संकटाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून महागाईने नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे. सरकारने तात्काळ इंधनावरील अतिरिक्त कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा गादी उतार व्हा..! अशी मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली.

तसेच NEET पेपर फुटीच्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि संबंधित जबाबदार केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनामध्ये शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर, जिल्हाध्यक्षा साधना शिंदे, दत्ता पाकीरे, विनायक लांबे, अशोकराव गायकवाड, इब्राहिम यवतमाळवाले, भारत मालुसरे, सलिम बडगेर, धम्मपाल अडसूळ युक्रांद आणि लाल बावटा तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

समाजवादी पार्टीच्या वतीने जनतेच्या प्रश्नांवर पुढील काळातही संघर्ष सुरू राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!