May 14, 2026 10:26 am

देशातील घडामोडींवर अभ्यासकांनी व्यक्त होण्याची गरज – प्रा. उल्हास बापट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, ता.‌१०: “घटना दुरुस्ती विधेयकावरून देशभरात चर्चा सुरु आहे. पुण्यात १५ विधी महाविद्यालय आहेत. त्यामध्ये ४५ हून अधिक प्राध्यापक संविधान शिकवणारे आहेत. पण ही मंडळी समाजाला गरज व्यक्त होताना दिसत नाहीत. संविधान काय आहे हे जनते पर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कर्तव्य आहे., ” असे मत व्यक्त करत प्रा. उल्हास बापट यांनी सांगितले की, आपली भारतीय लोकशाही मजबूत आहे ती अधिक प्रगल्भ होईल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे.

रविवारी गांधी भवन, कोथरूड येथे ३१ वे गांधी दर्शन शिबीर संपन्न झाले. यावेळी पहिल्या सत्रात, ‘महिला आरक्षण, डिलिमिटेशन विधेयक आणि घटनादुरुस्ती’ या विषयावर घटनातज्ञ

प्रा.उल्हास बापट यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी डॉ. प्रविण सप्तर्षी उपस्थित होते. यावेळी अभय छाजेड उपस्थित होते.

दुस-या सत्रात अस्थिर जग आणि आपण’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक जतीन देसाई यांनी मांडणी केली. या सत्राचे अध्यक्ष अन्वर राजन होते. तिस-या सत्रात अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी केले.

प्रा.उल्हास बापट म्हणाले की, संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. मात्र आपल्याकडे नवीन संसद इमारतीचे उद्घाटन झाले त्यावेळी त्त्यांनाच बोलावले नाही. संस्सदेला डेप्युटी स्पिकर गेली अनेक वर्षे नाहीत. लोकसभेची संख्या वाढवली पण राज्यसभेची नाही.

प्रा. उल्हास बापट म्हणाले की, महिलांसाठी खूप तरतुदी घटनेत आहेत. ७३ वी घटनादुरुस्ती कॉंग्रेस काळात घडली. आता नव्या महिला विधेयकाचे श्रेय पंतप्रधान मोदीजींना घ्यायचे असेल तर त्यांनी आत्ताच २०२३ च्या विधेयकाची अंमलबजावणी करावी. जनगणना होवून जी अधिक सदस्यांची संसद होणार आहे. त्याला २०३४ साल उजाडेल.

घटनादुरुस्ती ३६८ कलमानुसार केली जाते. मात्र संसदेला असा कुठलाही कायदा करता करणार नाही की ज्यामुळे मुलभूत अधिकार संकुचित होतील. भारत हे हिंदू राष्ट्र करायचे असे कोणी म्हणत असेल तर ते करता येणार नाही. कारण संविधानाच्या गाभ्यात बदल करता येणार नाही. घटनादुरुस्ती साठीची अमर्याद परवानगी संसदेला नाही.

आपण सर्वोत्तम राज्यघटना बनवली आहे. मात्र या राज्य घटने बाबत मला दोनच बाबतीत खंत आहे की, एक तर ती देशी भाषेत लिहिली नाही व दुसरे म्हणजे चरित्र संपन्न लोक संसदेत जातील अशी कोणतीही तरतूद त्यामध्ये नाही. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या विधानाचा संदर्भ देत प्रा. बापट म्हणाले की, आपण जे उत्तम बोलतात त्यांना निवडून देतो.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!