May 13, 2026 11:21 pm

निदा खान प्रकरण: मतीन पटेलच्या घर व कार्यालयावर बुलडोझर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नाशिक धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर अखेर महापालिकेने मोठी कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून या कारवाईबाबत संभाजीनगरात जोरदार चर्चा सुरू होती.

मतीन पटेल यांच्या कथित अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते, मात्र अखेर आज पहाटेपासून महापालिकेचे पथक अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून आले.

नारेगाव परिसरात महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त दाखल झाला. तब्बल 150 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि 100 पेक्षा जास्त महापालिका कर्मचाऱ्यांचा ताफा परिसरात पोहोचल्याने नारेगाव परिसर सकाळपासूनच दणाणून गेला. संभाव्य विरोध लक्षात घेऊन प्रशासनाने मोठी तयारी केली होती.

मात्र अपेक्षेप्रमाणे कोणताही आक्रमक विरोध झाला नाही. उलट मतीन पटेल यांच्या कुटुंबीयांनी महापालिका पथकाचे फुले उधळून स्वागत करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या घटनेने उपस्थितांमध्ये काही काळ आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले.

यानंतर महापालिकेच्या बुलडोझरने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. सर्वप्रथम मतीन पटेल यांचे राहते घर जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर शेजारील त्यांचे पक्ष कार्यालय पाडण्यात आले. पुढे ज्या घरातून नाशिक धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक करण्यात आली होती, त्या घरावरही बुलडोझर चालवत ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.

महापालिका प्रशासनाने ही कारवाई पूर्णपणे नियमित असल्याचे सांगितले. संबंधित बांधकामे अनधिकृत असल्याने नियमानुसार कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिस प्रशासनानेही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!