May 13, 2026 11:19 pm

NEET पेपर विकणाऱ्या डॉक्टर शुभमने ॲडमिशन घेतले पण कॉलेजला गेलाच नाही

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-यूजी २०२६ पेपर लीक प्रकरणात आता धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात नाशिकमधून अटक करण्यात आलेला संशयित शुभम खैरनार याच्याबद्दल नवनवीन माहिती समोर येत आहे.

शुभमचे कनेक्शन आता मध्य प्रदेशातील सीहोरशी जोडले गेले असून, त्याने गेस पेपरच्या नावाखाली लाखांची उलाढाल केल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

बुधवारी शुभम खैरनारला मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले होते. सुनावणीनंतर कोर्टाने त्याला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर करत सीबीआयच्या स्वाधीन केले आहे. सीबीआय आज संध्याकाळच्या विमानाने त्याला दिल्लीला घेऊन जाणार असून, गुरुवारी दिल्लीतील सीबीआय कोर्टात त्याला हजर केले जाईल. शुभमच्या मागे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून, इतर साथीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची कोठडी महत्त्वाची असल्याचे सीबीआयने म्हटले.

शुभम खैरनार हा मध्य प्रदेशातील सीहोर येथील श्री सत्य साई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असल्याचे समोर आले. त्याने २०२१ मध्ये बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. मात्र, युनिव्हर्सिटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवेश घेतल्यापासून तो एकदाही वर्गात आला नाही, ना त्याने कोणती परीक्षा दिली. तो कधीही कॅम्पसमध्ये फिरकला नाही किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी झाला नाही, असे कुलगुरू मुकेश तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.

शुभमने पुण्याच्या एका संशयिताकडून १० लाख रुपयांना गेस पेपर विकत घेतला होता. त्यानंतर त्याने तोच पेपर हरियाणातील एका ग्राहकाला १५ लाख रुपयांना विकला. राजस्थानात तपासादरम्यान एक हस्तलिखित पेपर मिळाला होता, ज्यातील प्रश्न नीट परीक्षेच्या पेपरशी मिळतेजुळते होते. जीवशास्त्राचे सर्व ९० आणि रसायनशास्त्राचे ४५ प्रश्न या गेस पेपरमध्ये होते.

मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगावचा रहिवासी असलेल्या शुभमचे वडीलही डॉक्टर असल्याचे सांगितले जाते. शुभम नाशिकमध्ये एका फ्लॅटमध्ये राहून प्रॅक्टिस करत होता. बुधवारी तो आपल्या फ्लॅटजवळील मंदिरात दर्शनासाठी गेला असताना नाशिक गुन्हे शाखेने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!