May 14, 2026 5:09 am

उंदीर मारण्याचं घरातील औषध हर्बल मग शरीरात विष कुठून आलं?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दक्षिण मुंबईतील पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या गूढ मृत्यूने संपूर्ण शहर हादरले होते. चिकन बिर्याणी आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्ल्ल्याने विषबाधा झाली.त्यातच चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली होत. या चौघांच्या मृत्यूसाठी उंदीर मारण्याचे औषध कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला असून डोकाडिया कुटुंबाच्या घरात आढळलेल्या औषधात झिंक फॉसफाईड नसल्याचे समोर आल्याने प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या शरीरात झिंक फॉस्फाईटचे अंश सापडले आहे.. याचा वापर उंदीर मारण्यासाठी केला जातो. कलिना येथील एफएसएल लॅबमधील तज्ज्ञांनी अनेक चाचण्या केल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. चौघांच्या शरिरात झिंक फॉस्फाईट कसं गेलं याचा शोध घेतला जात आहे. या चौघांची आत्महत्या आहे की त्यांना कोणी विषारी औषध देऊन मारलंय? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दरम्यान डोकाडिया कुटुंबाच्या घरात उंदीर मारण्याचं औषध आढळलं आहे. उंदीर मारण्याच्या औषध जप्त करण्यात आला आहे. डोकाडिया यांच्या घरी रॅट रिपेलेंट आढळलं आहे. मात्र उंदीर पळवण्याच्या औषधात झिंक फॉस्फाइड नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डोकाडिया यांच्या घरात सापडलेला उंदीर पळवण्याचं औषध नैसर्गिक म्हणजेच हर्बल आहे. चौघांच्याही शरीरातून तसेच कलिंगडाच्या नमुन्यात फॉरेन्सिकच्या तपासणीत झिंक फॉस्फाइड आढळलं आहे. त्यामुळे झिंक फॉस्फाइड डोकाडिया यांच्या घरात कुठून आलं असा सवाल उपस्थित होत आहे.

जर घरात असणाऱ्या उंदीर पळवण्याच्या औषधामध्ये झिंक फॉस्फाइड नाही तर हे डोकाडिया कुटुंबाच्या शरीरात कसे गेले, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे हा घातपात असावा की आत्महत्या अशी चर्चाही रंगली आहे. अब्दुल्ला व आयेशा यांचा उपचारादरम्यान जबाब नोंदविण्यात आला होता. त्यांनीही बिर्याणी नंतर कलिंगड खाल्ल्याचे म्हटले होते.

पायधुनी पोलीस आणि गुन्हे शाखा आता या बाजूने तपास करत आहेत की, हे विष कुटुंबाकडे कुठून आलं? तसेच, कुटुंबाने इतके टोकाचे पाऊल का उचललं? याचे कारण शोधण्यासाठी त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती घेतली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!