May 14, 2026 4:10 am

कॉलेजमधील वासनांध मुलामुळे 26 वर्षीय सावत्र आई प्रेग्नंट

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नागपूरमध्ये माणुसकी आणि नातेसंबंधांचे मूळ स्वरूपच हादरवून टाकणारी एक घटना काल (7 मे) उघडकीस आली होती. इथे एका मुलाने आपल्या सावत्र आईवर वारंवार बलात्कार केला, ज्यामुळे ती गर्भवती झाली.ज्या प्रकरणी नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, आता याचबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पण त्याआधी नेमकी घटना काय ते समजून घ्या.

नागपूरमधील एका 26 वर्षीय महिलेने तिच्या सावत्र मुलाविरोधी पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीत पीडित महिलेने सावत्र मुलाकडून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. जेव्हा ही घटना उघडकीस आली, तेव्हा पीडिता चार महिन्यांची गर्भवती होती.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, 2024 मध्ये तिची एका खाजगी बँकेत व्यवस्थापक असलेल्या विकास श्रीवास्तव नावाच्या 55 वर्षीय व्यक्तीशी भेट झाली. असा आरोप आहे की, श्रीवास्तवने तिला नोकरीचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक साधली. तरुणी विकासच्या प्रेमात पडली आणि तिने काही दिवसांनी विकाससोबत मंदिरात जाऊन लग्न केले. लग्नानंतर पीडितेची भेट अक्षतशी झाली. 21 वर्षीय अक्षत हा विकासचा पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. जो सध्या एका नामांकित महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत आहे.

तिने तक्रारीत पुढे सांगितले की, लग्न झाल्यानंतर काही दिवसातच पती विकाससोबत काही घरगुती वाद सुरू झाले. या सगळ्या गोष्टी 21 वर्षीय अक्षतसमोरच घडत होत्या. दरम्यान, नोव्हेंबर 2025 मध्ये आणि पुन्हा 10 एप्रिल 2026 रोजी, पीडिता घरी एकटी होती, तेव्हा तिचा सावत्र मुलगा अक्षत हा तिच्या खोलीत घुसला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने आपल्या पतीला याबद्दल सांगितले, तेव्हा एक धक्कादायक घटना घडली. त्याने तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की या प्रकरणामुळे कुटुंबाची बदनामी होईल आणि मुलाचे भविष्य उद्ध्वस्त होईल. पतीच्या या सल्ल्यामुळे खरं तर पीडितेला मोठा धक्का बसला होता. अखेर स्वतःवर झालेल्या अत्याचाराला कंटाळून, तिने हिंमत एकवटली आणि ती मानकापूर पोलीस ठाण्यात गेली. तिच्या तक्रारीवरून, पोलिसांनी तिच्या सावत्र मुलावर बलात्काराच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!