May 14, 2026 9:37 am

इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात निम्मं वऱ्हाड उपाशी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदूरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाहसोहळा संगमनेरमध्ये धुमधडाक्यात पार पडला.

तब्बल 100 एकरमध्ये हा भव्य विवाहसोहळा पार पडला असून लग्नासाठी हजारो लोक उपस्थित होत आहे. . मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांना या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. विवाह सोहळ्यानंतर देखील या शाही लग्नाची चर्चा अजूनही सोशल मीडियावर होताना दिसत आहे. लग्नाची एन्ट्री, डेकोरेशन, रुखवत, आतषबाजी, कानपिळी लग्नाच्या शाही सोहळ्याचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या रॉयल सोहळ्यात सामान्य वऱ्हाड्यांचे हाल झालेला देखील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह रविवारी संगमनेर येथे साहिल चिलप यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत वधू-वरांना आशीर्वाद दिले. लग्नात व्हीव्हीआयपी ते इंदुरीकर महाराजांना मानणारा अनेक सामान्य गावातील वऱ्हाडी देखील होते. व्हीव्हीआयपीच्या गर्दीत सामान्य वऱ्हाड्यांचे जेवणाचे मात्र हाल झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडींची संख्या लक्षात घेता जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपारिक पद्धतीने करण्यात आली होती. या शाही विवाह सोहळ्यासाठी अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांची मेजवानी ठेवली होती. मोती पाक बर्फी, मिक्स व्हेज, डाळ भात, पुरी, मटकी असा साधा मेन्यू ठेवण्यात आला होता. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, लग्न अतिशय थाटामाटात पार पडले. मात्र जेवणाचं नियोजन अजिबात चांगला नव्हता, कुणाला फक्त डाळ भात भेटला तर कुणाला फक्त मटकी तर काहींना चपाती तर काही ना पुरी मिळाली. जेवणाचे नियोजन पाहता काही लोक उपाशी निघून गेले किंवा कोणी हॉटेलमध्ये जेवण करणे पसंद केलं.

बऱ्याच लोकांची शंका आहे इंदोरीकर महाराज लोकांना सांगतात आणि स्वतःच्या मुलीचा लग्न मोठं का केलं? त्याचं उत्तर असं आहे की ज्याची परिस्थिती आहे, ज्याला संतांनी दिलं, ज्याच्यावर ज्ञानोबारायांची कृपा आहे त्याने जरूर मोठं लग्न करावं, असं स्पष्टीकरण इंदोरीकर महाराज यांनी दिलं आहे.

काही महिन्यांपूर्वी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा झाला. या साखरपुड्यानंतर जोरदार टीका महाराजांवर करण्यात आली. दुसऱ्यांना लग्न साधेपणाने करण्याचे महाराज सांगतात आणि स्वत: च्या मुलीच्या लग्नात महाराजांना सर्व गोष्टींचा विसर पडला म्हणते लोक जोरदार टीका करत आहेत. लग्नावर लोक मोक्कार पैसा खर्च करत असल्याचे कायमच इंदोरीकर महाराज सांगतात. लग्न अगदी साधेपणाने व्हावे, असे त्यांनी अनेकदा त्यांच्या किर्तनात बोलून दाखवले होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!