April 23, 2026 5:08 pm

*’एक्सप्रेस वे’वरील महाप्रचंड वाहतूक कोंडीनंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली चूक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

‌’हो, आमची व्यवस्था कमी पडली, असं म्हणतमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील गंभीर वाहतूक कोंडीनंतर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी प्रशासनाची चूक मान्य केली आहे. तसेच आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेला टँकर हटवण्यासाठी एवढा वेळ का लागला, याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आमची व्यवस्था कमी पडली. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर असे अपघात पूर्वीही घडले आहेत, पण या घटनेत टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने टँकर बाजूला काढण्यास आणि गळती थांबवण्यास अडचणी आल्या. सामान्यतः अशा अपघातांना 8 तासांच्या आत प्रतिसाद दिला जातो, पण या प्रकरणात गॅसच्या ज्वलनशील स्वभावामुळे वेळ लागला. योग्य प्रयोग पद्धतीने ही घटना हाताळली नसती तर मोठी दुर्घटना देखील होऊ शकले असती.

आता मात्र अशा घटना पुढे टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. यात चालकांसाठी नवीन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यासह इतर प्रतिबंधात्मक उपायांचा समावेश आहे. याबाबत उपाययोजना सुरू आहेत. ” असे जिल्हाधिकारी डूडी यांनी स्पष्ट केले.

या अपघातामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. एसटी बसेस बंद करण्यात आल्या, जुना महामार्ग ओव्हरलोड झाला आणि पर्यायी मार्गांवरही कोंडी निर्माण झाली. प्रशासनाने बचाव पथके, केमिकल तज्ज्ञ आणि मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल केल्या होत्या. टँकर हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते आणि नंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. हा अपघात प्रशासनासाठी पहिल्यांदाच इतका विचित्र आणि आव्हानात्मक ठरला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारत आमची व्यवस्था कमी पडली.” असे कबूल केले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!