April 20, 2026 2:39 am

रनवे दिसला की सांगतो…’ लँडिंगआधी पायलटचे अखेरचे शब्द

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील आणि देशातील अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.

अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी कालपासूनच बारामतीत प्रचंड जनसागर उसळलेला पाहायला मिळतोय. ‘दादा’ अचानक आपल्यातून निघून गेले, ही गोष्ट अजूनही कुणालाच पचनी पडलेली नाही. अपघाताची बातमी समजताच पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे.

लँडिंगआधी पायलट नेमकं काय म्हणाला?

अजित पवार काल बुधवारी सकाळी खासगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी साधारण 8.45 च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अचानक हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर आता सरकारचा प्राथमिक अहवाल समोर आला असून त्यात धक्कादायक तपशील उघड झाले आहेत.

सरकारच्या प्राथमिक अहवालात काय म्हटलंय?

प्राथमिक अहवालानुसार, संबंधित विमान सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) च्या संपर्कात आलं. त्यावेळी वैमानिकांना हवामानाबाबत माहिती देण्यात आली.

एटीसीकडून सांगण्यात आलं की सध्या वारा फारसा नाही आणि दृश्यमानता अंदाजे 3000 मीटर आहे.

यावर पायलटने एटीसीला कळवलं की, ते रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत आहेत. मात्र काही क्षणांनी पायलटने पुन्हा संपर्क साधत,

“रनवे अजून दिसत नाहीये… रनवे दिसू लागला की सांगतो,” असे शब्द एटीसीला सांगितले.

सकाळी 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी पूर्णपणे सज्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूने मोठ्या प्रमाणात ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने दिली.

रायगड दौरा ठरला अखेरचा राजकीय संवाद

सहकारातून सत्तेपर्यंत मजल मारणाऱ्या अजित पवार यांचा रायगड जिल्ह्यातील दौरा हा त्यांचा अखेरचा राजकीय संवाद ठरला. काही महिन्यांपूर्वी अलिबाग येथे काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रवीण ठाकूर यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या प्रवेश सोहळ्यामुळे जिल्ह्यात मोठं राजकीय वातावरण तापलं होतं.

यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार नागोठणे येथे एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. विकासकामे, प्रशासन, निवडणुका आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांनी आपली स्पष्ट राजकीय भूमिका मांडली होती. रायगड जिल्ह्यातील हीच त्यांची शेवटची उपस्थिती ठरली, हे आज आठवताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळताना दिसत आहेत.

एकूणच, राज्याच्या राजकारणात धडाडीचा, थेट बोलणारा आणि निर्णयक्षम नेता आपण गमावला असून अजित पवार यांची उणीव महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्राला कायम जाणवत राहणार आहे. Batami karun dya

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!