May 15, 2026 1:54 pm

कांद्याला मिळाला इनमिन ५० पैसे भाव

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बाजार समितीमध्ये कांद्याला ठोक भाव किलोला फक्त ५० पैसे इतका मिळाल्याने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे.करमाळा तालुक्यातील पांगरे येथील शेतकरी अंकुश अण्णा गुंजाळ यांनी ७३ गोणी कांदा विकल्यानंतर सर्व खर्च वजा जाता त्यांच्या हातात केवळ ४०० रुपये राहिले आहेत.

बळीराजाच्या नशिबी आलेली दैना पुन्हा एकदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली.

शेतकरी रडकुंडीला : गुंजाळ यांनी २१ एप्रिल रोजी सोलापूरच्या शरीफ ट्रेडर्स या आडत दुकानावर ७३ पिशव्या कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र, बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने व मागणी घटल्याने त्यांच्या कांद्याला प्रति किलो केवळ ५० पैसे इतकाच भाव मिळाला.

कांद्याच्या विक्रीतून मिळालेली एकूण रक्कम व त्यावर झालेला खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. ७३ पिशव्या कांदा विकल्यानंतर गुंजाळ यांना एकूण ५,०६८ रुपये मिळाले होते. गाडी भाडे, हमाली, तोलाई, इतर आडत खर्च वजा जाता, प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हाती ४०० रुपयेच पडले.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!