May 14, 2026 8:14 pm

बरगी डॅम बोट अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? शेवटचे ‘ते’ भयानक क्षण कॅमेरात कैद

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मध्यप्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणावर एक अत्यंत भयानक दुर्घटनाक घडली आहे.३० एप्रिलच्या संध्याकाळी एका बोटीचा भीषण वादळात अडकून अपघात झाला आहे. या अपघातात ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांमध्ये ८ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

३० एप्रिल रोजी संध्याकाळी बरगी धरणावर पर्यटकांनी भरलेली क्रूझ वादाळामुळे नदीत उलटली. ऑरेंज अलर्ट देण्यात आला असतानाही क्रूझला परवानगी देण्यात आली होती. अशा वेळी हवामानाने अचानक कूस बदलली आणि बोट उलटून भीषण अपघात झाला. या अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की सोसाटाच्या वारा वाहत असून बोटीत पाणी शिरले आहे. बोटीत पाणी शिरु लागताच पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि आराडा-ओरडा सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाही पर्यटकाने लाईफ जॅकेट घातलेले नाही.

वाचलेल्या प्रवाशींचा आरोप आहे की, कर्मचाऱ्यांनी त्यांना लाईफ जॅकेट दिले नव्हते. लाईफ जॅकेट पेटीत बंद करुन ठेवण्यात आले होते. व्हिडिओतही तुम्ही पाहू शकता की पाणी बोटीत शिरल्यावर लाईफ जॅकेट काढून प्रवाशांना दिले जात आहे. मात्र तोपर्यंत जहाज जवळपास अर्धे पाण्यात गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार या बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. शिवाय मदतीचा संदेश देऊनही रेस्क्यू टीम उशीरा पोहोचली होती. यावेळी काही स्थानिक मच्छिमार आणि शेतकऱ्यांनी धाडस दाखवत मदतीस धाव घेतली आणि १५ हून अधिक लोकांचा जीव वाचवला.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @PublicNewsX वर शेअर होत आहे. या अपघातवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑरेंज अलर्ट असूनही क्रूझला परवानगी का देण्यात आली? पर्यटकांनी लाईफ जॅकेट का घातले नव्हते? रेस्क्यू टीम उशीरा का पोहोचली असे अनेक प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!