April 17, 2026 4:28 pm

*मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण करणार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६चे ४८५ किमींपैकी ४६५ किमींचे चार पदरी काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित २० किमी अंतरावरील काम सुरू असून जून २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत सांगितले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. एक महामार्ग बनवण्यास एवढी वर्षे लावून सरकार कंत्राटदारांचे खिसे भरत आहेत का, असा प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत विचारला होता.

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मुंबईला दिल्ली, नगर, पुणे आणि गोवा यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या या प्रकल्पांमध्ये वारंवार विलंब होत असून खर्च वाढत आहे.

हे प्रकल्प कधी पूर्ण होणार, याबाबत सरकारकडे काही निश्चित रोडमॅप आहे, यासह यासंबंधी प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या उत्तरात असे म्हटले आहे, की मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच) क्रमांक ६६ची लांबी अंदाजे ४८५ किमी आहे.

या राष्ट्रीय महामार्गाला चौपदरी मार्गाच्या कामास डिसेंबर २०११ मध्ये सुरुवात झाली असून १२ प्रकल्प पॅकेजेसमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले व आजपर्यंत ४६५ किमीचे चाैपदरी काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित २० किमी अंतरावरील काम सुरू असून जून २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

दिल्ली-मुंबई प्रकल्प

दिल्ली-मुंबई प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे १,३५० किमी असून, भूसंपादन, वृक्षतोडीच्या परवानग्यांमुळे विलंब होत आहे. एक्स्प्रेस वेचा सुमारे ८७५ किलोमीटरचा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दिल्ली ते बडोदा विभागातील काम मे २०२६ आणि बडोदा ते मुंबई विभागातील काम जून २०२६पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!