April 17, 2026 4:29 pm

*पलाश-स्मृती मानधना वाद उच्च न्यायालयात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादाबाबत स्मृतीचा बालमित्र असल्याचा दावा करणारा निर्माता अभिनेता विज्ञान मानेला पलाश याच्याबाबतच्या कथित बदनामीकारक, आक्षेपार्ह विधाने करण्यापासून उच्च न्यायालयाने नुकतीच मनाई केली.

विज्ञान मानेने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पलाशविरुद्ध बदनामीकारक भाष्य केले होते, पलाशने विज्ञानविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, व्यावसायिक वादातून विज्ञानने त्याच्यासह कुटुंबाविरुद्ध बदनामीकारक विधाने केल्याचा दावा केला होता.

त्याचप्रमाणे त्याबद्दल नुकसानभरपाई आणि आक्षेपार्ह विधाने करण्यापासून कायमस्वरूपी मनाईचे आदेश देण्याची मागणी केली होती. याचिकेची न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने गंभीर दखल घेतली. विज्ञानने केलेल्या टिप्पण्या प्रथमदर्शनी बदनामीकारक असल्याचे नमूद करून पलाशला अंतरिम दिलासा दिला.

तसेच, अशा टिपणीमुळे एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकते, असेही पलाशला पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम दिलासा देताना न्यायालयाने नमूद केले. स्मृती आणि पलाशचे लग्न रद्द केल्याबद्दल विज्ञानने केलेल्या काही स्फोटक आरोपांमुळे हा वाद आणखी वाढला होता.

आपण पलाश आणि स्मृतीच्या लग्नाला उपस्थित होतो आणि लग्नाच्या एक दिवस आधी पलाश दुसऱ्या महिलेसोबत पकडला गेल्यामुळे समारंभाला उपस्थित भारतीय महिला क्रिकेटपटूंनी पलाशला मारहाण केल्याचा दावाही विज्ञानने समाजमाध्यमावरून केला होता.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!