April 23, 2026 5:00 pm

पाहणीपुरते न थांबता काम पूर्ण; आंबेगाव बुद्रुकमध्ये चोरघे दाम्पत्याची कृतीशील भूमिका

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आंबेगाव बुद्रुकमध्ये तीन प्रमुख नागरी कामांवर नगरसेविका प्रतिभाताई चोरघे व रोहिदास बापू चोरघे यांचे विशेष लक्ष

पुणे | आंबेगाव बुद्रुक :
आंबेगाव बुद्रुक परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नागरी समस्या सोडवण्यासाठी नगरसेविका सौ. प्रतिभाताई चोरघेश्री. रोहिदास बापू चोरघे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम सुरू केले आहे. पाहणीदरम्यान नागरिकांना दिलेले आश्वासन केवळ शब्दांपुरते न ठेवता, त्या समस्यांवर ठोस उपाययोजना करत तीन महत्त्वाच्या कामांवर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.


ड्रेनेज चेंबरची धोकादायक अवस्था – नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

श्रीराम मंदिराजवळ तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मागील परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबरची झाकणे उघडी असल्याचे निदर्शनास आले होते. पावसाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी ही चेंबर नागरिकांसाठी मोठा धोका ठरत होती. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वार यांच्यासाठी ही परिस्थिती गंभीर असल्याची दखल घेत नगरसेविका प्रतिभाताई चोरघे यांनी स्वतः उपस्थित राहून संबंधित विभागाकडून अनेक चेंबरची झाकणे तातडीने बसवून घेतली. या कामामुळे परिसरातील अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


पिण्याच्या पाण्याची समस्या – सुरळीत पुरवठ्यासाठी सातत्याने पाठपुरावा

आंबेगाव बुद्रुक परिसरात नागरिकांना कमी दाबाने तसेच रात्री अपरात्री पाणी येण्याची समस्या दीर्घकाळ भेडसावत होती. यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक दुरुस्ती, लाईन तपासणी आणि वेळापत्रक सुधारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, लवकरच नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


आंबेगाव पठार रस्ता रुंदीकरण – भविष्यातील वाहतुकीचा विचार

आंबेगाव पठार येथील रस्ता रुंदीकरणाचे काम हे परिसराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या कामासंदर्भात रोहिदास बापू चोरघे यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देत संपूर्ण रस्त्याच्या कामाचे तांत्रिक प्लॅनिंग, रुंदी, ड्रेनेज व्यवस्था आणि वाहतूक नियोजन याची सविस्तर माहिती घेतली. काम सुरू असताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, तसेच भविष्यात वाहतुकीची कोंडी टाळता येईल, यासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.


या तीनही कामांमुळे आंबेगाव बुद्रुक परिसरातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून,
समस्या ओळखून केवळ आश्वासन न देता त्या प्रत्यक्ष मार्गी लावण्याचे काम सुरू आहे, ही बाब समाधानकारक आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!