बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात एका नवविवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अंबाजोगाईतील मोरेवाडी या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होते. गणेश दत्तू कोळी असे मृत तरुणाचे नाव असून ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत होते. अवघ्या १२ दिवसांपूर्वीच मृत गणेश कोळी यांचा विवाह झाला होता. अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीने त्यांची पत्नी कार्यरत आहे. पत्नी ड्यूटीवर गेलेली असताना गणेश कोळी यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
अवघ्या १२ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुण तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोरेवाडी परिसरात उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. नवविवाहित दाम्पत्यावर काळाने घाला घातल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गणेश दत्तू कोळी असे मृत तरुणाचे नाव असून ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी हे पत्नीसमवेत अंबाजोगाईतील मोरेवाडी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांची पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे. घटनेच्या वेळी पत्नी ड्युटीवर गेली असताना गणेश यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. नवविवाहानंतर इतक्या कमी कालावधीत घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गणेश कोळी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
कल्याणमध्ये पोटच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापानेच कपाळावर टोकदार हत्याराने वार करून मुलीला संपवले. कल्याणच्या दुधनाका परिसरातील ही संतापजनक घटना आहे. २५ वर्षीय विवाहित गायत्री शिंदे, नामक महिला माहेरी वडीलाकडे राहण्यास आली होती. अज्ञात कारणावरून वडिलांचा आणि मुलीचा वाद झाला. यादरम्यान संतप्त वडिलांनी टोकदार हत्याराने वार करून केली हत्या, बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद, हत्येनंतर ५० वर्षीय आरोपी पिता विनोद वसईकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलिसांची दोन पथके आरोपीच्या शोधत आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.










