April 23, 2026 3:51 pm

*सिनेमा फिका पडेल असं पोलिसवाल्याचं क्रिमिनल डोकं

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

एक मैत्री, त्यातून निर्माण झालेला संशय आणि त्या संशयातून घडलेली अमानुष हत्या. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील शेतविहिरीत सापडलेल्या मृतदेहामागची कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.

धक्कादायक म्हणजे, आरोपींनी मृतदेहासोबत तब्बल 191 किमी प्रवास केला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नवी मुंबई पोलिस दलातील कार्यरत हवालदार असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी रोजी लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील सुखेड गावात एका शेतविहिरीत जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पुसण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट झालं होतं. अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल करून लोणंद पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या तीन दिवसांत हा भीषण कट उघडकीस आणला.

पोलीस हवालदार निघाला मास्टरमाईंड

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस पुण्यातील एका संशयित कारपर्यंत पोहोचले. या धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला. बंडू भिसे, रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हवालदार, यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले.

मैत्री आणि संशय

नवी मुंबईत राहणाऱ्या हवालदार बंडू भिसे आणि सोमनाथ बोबडेंची मैत्री होती. पण सोमनाथचे आपल्या मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचा बंडू भिसेला गेल्या काही दिवसांपासून संशय होता. मात्र, सोमनाथचे संबंध असल्याचा संशय बंडूच्या मनात घर करून बसला होता. याच संशयातून त्याने सूड उगवण्याचा कट रचला .त्यासाठी बंडूनं पुण्यातील ५ फेब्रुवारी रोजी बंडूने पुण्यातून विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे यांना बोलावून घेतलं.

कारमध्ये गळा दाबून केला खून

5 फेब्रुवारीला कळंबोलीत संशयित आरोपींनी सोमनाथ बोबडे याला कळंबोली इथं जबरदस्तीने होंडा सिटी कारमध्ये (MH -12 DY 8846) बसवून दोरीने हातपाय बांधले. गाडीतच त्याचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी त्याचा मृतदेह कारमध्ये घेऊन साताऱ्याच्या दिशेनं निघाले. धक्कादाय बाब म्हणजे, आरोपींनी सोमनाथचा मृतदेह कारमध्ये बसलेल्या अवस्थेत ठेवला होता. त्यानंतर मृतदेह कारच्या पुढील सीटवर ठेवून बंडूने स्वतः १९१ किलोमीटरचा मृत्यूचा प्रवास केला.

विहिरीच्या काठावर जाळला मृतदेह

सुखेड गावात पोहोचल्यानंतर विहिरीच्या काठावर मृतदेह जाळण्यात आला आणि नंतर तो विहिरीत ढकलून आरोपी मुंबईत परतले. स्वतः पोलीस असल्याने कोणताही पुरावा मागे राहू नये, यासाठी त्यांनी विशेष खबरदारी घेतल्याचं तपासात उघड झालंय. अटकेनंतर बंडूने गुन्ह्याची कबुली देण्यास नकार दिला होता. मात्र, लोणंद पोलिसांनी त्याच्या साथीदारांना विश्वासात घेतल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम समोर आला.

असा सापडला बंडू पोलिसांच्या ताब्यात

अत्यंत थंड डोक्यानं आरोपींनी तो गुन्हा केला होता. तसंच तो लपवण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला होता. पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो गुन्हा लपू शकला नाही. पोलिसांना 6 फेब्रुवारीला या गुन्ह्याची खबर लागली. आणि मग पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली. दरम्यान पोलिसांच्या हाती एका संशयित कारचा सीसीटीव्ही लागला. पोलिसांनी खोलात जावून तपास केल्यानंतर हळूहळू उलगडा होत गेला. पोलीस बंडू भिसेपर्यंत जावून पोहोचले आणि त्याची चौकशी केली. पोलीस चौकशीत बंडू भिसेनं गुन्ह्याची कबुली दिली. अवघ्या 3 दिवसांत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिवाजी जायपात्रे आणि उपनिरीक्षक रोहित हेगडे यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!