April 23, 2026 9:14 pm

लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला संघर्षकाळ

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कलाकार पडद्यावर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यामुळे प्रेक्षकांना नेहमी ते हसताना दिसतात; पण त्यांच्या खऱ्या आयुष्यात ते कोणत्या परिस्थितीतून जात असतात याची कल्पना फक्त त्यांनाच असते. बऱ्याचदा ही मंडळी अगदी खंबीरपणे त्यातून बाहेर येतात. असंच काहीसं घडलेलं अभिनेत्री इरावती लागू यांच्याबरोबर.

 

इरावती लागू या मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी नाटक आणि मालिकेत काम केलं. आहे. नुकतीच त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी त्यांच्या संघर्षकाळाबद्दल सांगितलं आहे. त्यांना वयाच्या १८ व्या वर्षीच गंभीर आजार झालेला आणि त्यानंतर त्यांचं आयुष्यच पूर्णपणे बदललं, असं त्यांनी यामधून सांगितलं आहे.

इरावती याबद्दल म्हणाल्या, “वयाच्या १८ व्या वर्षी एखादा आजार होणं खूप गंभीर असतं. तो आजार कळल्यानतंर त्यातून बाहेर येणं खूप कठीण असतं. मी पाच वर्षं त्या आजाराशी झुंज देत होते. हा खूप मोठा काळ आहे.” पुढे त्या म्हणाल्या, “मी दहावीत असताना पहिल्यांदा ‘दुनिया रंग रंगली’ मालिकेत काम केलं, जी दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. मला अभिनयातच काम करायचं होतं. त्यानंतर आत्मविश्वास मिळाला होता. मग धडपड करायला सुरुवात केली; पण त्यात हा आजार आला. मला खूप त्रास व्हायला लागला. हाताची बोट सुन्न व्हायची वगैरे.”

इरावती पुढे आजारपणाबद्दल म्हणाल्या, “दोन महिने मी तो त्रास सहन केला. कारण- तेव्हा डॉक्टरांचा संपं होता. त्यामुळे उपचार घेता आला नाही. पण, एक दिवस माझा आतेभाऊ घरी आला आणि त्यानं परिस्थिती पाहिल्यानंतर सांगितलं की, त्याची बायको पुण्यातील रुग्णालयात अकाउंटंट म्हणून काम करायची. तिथले सगळे डॉक्टर तिच्या ओळखीचे होते. मग पुण्यात माझ्यावर उपचार झाले. त्यावेळी केसांपासून पायांपर्यंत सगळ्या टेस्ट झाल्या आणि त्यातून कळलं की, हा मोनो न्युरोटीस मल्टीप्लेक्स आजार आहे. म्हणजे माझी एक नस डॅमेज झालीये आणि त्यामुळे पाय खूप दुखायचे माझे. खूप आग आग व्हायची आणि वेदना व्हायच्या. तिथे मी शॉक ट्रीटमेंट घेतली, जेणेकरून कळायला की, पायांतील नसा कुठपर्यंत काम करत आहेत. तेव्हा माझ्या दोन्ही पायांमध्ये मोठमोठ्या सुया घातल्या जायच्या त्यामुळे एका पायाला तो त्रास जाणवायचा; पण दुसऱ्या पायाला तो त्रास जाणवायचाच नाही. अजूनही माझ्या एका पायाला सेन्सेशन नाहीये; पण मी माझ्या इच्छाशक्तीवर चालते.”

 

इरावती उपचाराबद्दल पुढे म्हणाल्या, “तेव्हा त्यांना कळलं की, यावर एकच उपाय आहे तो म्हणजे फक्त वेदना कमी करणं. कारण- त्यांनी मला सांगितलेलं की, आता त्या नर्व्हज ड्रमेज झाल्या आहेत, त्या तर आम्ही परत आणू शकत नाही; पण तुला त्रास कमी होईल यासठी उपचार करू शकतो. त्यावर फक्त स्टेरॉइड्स हाच एकमेव पर्याय होता. त्यामध्ये माझी चार वर्ष गेली आणि त्यामुळे शरीरावर खूप परिणाम झाले. माझे केस गेले. माझ्याकरिता २० व्या वर्षात हे सगळं होणं खूप त्रासदायक होतं. एकदा तर एका गोळीमुळे दृष्टी गेली होती एक दिवसासाठी. तेव्हा आई खूप घाबरलेली. पण, डॉक्टरांनी सांगितलं की एका गोळीचा परिणाम झालाय; परंतु दिसायला लागेल तिला आणि मग पुन्हा दृष्टी आली. मग डॉक्टरांनी स्टेरॉइड्स कमी केले, मग पुन्हा वाढवले आणि हळूहळू मी बरी होत गेले.”

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!