मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.२ डिसेंबर २०२५ रोजी शंभूराज खुटवड यांच्याशी विवाहबंधनात अडकल्यानंतर, प्राजक्ताने आपली लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली.
या खास निमित्ताने प्राजक्ताने एक विशेष फोटोशूट केले असून तिने नेसलेल्या काळ्या रंगाच्या टिशू सिल्क साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.या पारंपरिक लूकला अधिक उठावदार बनवण्यासाठी प्राजक्ताने हलव्याचे दागिने परिधान केले होते.सुंदर मेकअप आणि हेअरस्टाईलमुळे प्राजक्ताचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.पुण्यात शाही थाटात विवाह पार पडल्यानंतर प्राजक्ताच्या या पहिल्या संक्रांतीच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
चाहत्यांकडून प्राजक्ताच्या या मकर संक्रांतीनिमित्त केलेल्या लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.











