May 15, 2026 2:12 am

कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, अहवालातील ‘त्या’ एका शब्दाने सस्पेन्स वाढला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईतील पायधुनी परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणाचा शवविच्छेदन (पोस्टमॉर्टम रिपोर्ट) अहवाल समोर आला आहे. मात्र समोर आलेल्या अहवालातून कारण स्पष्ट होण्याऐवजी मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे.

मुंबईच्या पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूच्या नवी अपडेट समोर आली आहे. चार मृतदेहांच्या प्राथमिक शवविच्छेदनाचा अहवाल आला आहे. या चौघांचा मृत्यूचं कारण स्पष्ट नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण (निरीक्षण) पेंडिंग असं लिहलं आहे. त्यामुळे या प्रकरणात फॉरेन्सिकच्या अहवालानंतर कारण स्पष्ट होणार आहे. – फॉरेन्सिकचा अहवालाचा जेजे रुग्णालयातील अधिकारी अभ्यास करणार आणि त्यानंतरच होणार मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल येण्यासाठी आणखी आठवडा लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. FDA चा अहवाल दोन दिवसांनी अपेक्षित आहे. मात्र महत्वाचा मानला जाणारा फॉरेन्सिकचा अहवाल येण्यास अजून काही दिवस जाणार आहे. संपूर्ण तपास हा याचं अहवालांवर अवलंबून असून पोलीस देखील फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहे. पोलिसांनी प्रायॉरिटीवर अहवाल मागितला होता.

या प्रकरणात सध्या तरी कोणताही संशयास्पद मुद्दा आढळलेला नाही. त्यामुळे पोलीस सगळ्या बाजून तपास करत आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त अब्दुल्ला डोकाडिया हा एका प्रकरणात साक्षीदार होता. 2019 साली डी एन नगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली होती. जोगेश्वरीतील एका विकासकला एका महिलेने पैसे दिले होते. विकासकाने पैसे घेण्यास अब्दुल्ला यांना पाठवलं होतं नंतर ते पैसे विकासाकाने परत दिले नाही. महिलेने 2019 साली या प्रकरणी डी एन नगर पोलीस स्टेशनला फसवणूकीची तक्रार दाखल केली. या प्रकरणात अब्दुल्ला हे साक्षीदार होते आणि त्यांची साक्ष महत्वाची ठरणार होती. 2026 साली या प्रकरणाची सुनावणी होणार होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!