May 15, 2026 2:09 am

आईचे-मुलाशी अनैतिक संबंध असल्याचा बापाला संशय

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आई आणि मुलाच्या नात्याला कलंकीत करणारा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दादाच आईसोबत खिडकी बंद करून काहीतरी करतो असा जन्मदात्या वडिलांना संशय होता. याच संशयातून त्याने आपल्या पोटच्या लेकराचीच हत्या केली.

हत्या केलेल्या तरुणाचं नाव प्रियांशु (वय 18) असे आहे. नराधम बापाने मुलाला आधी विष पाजलं आणि नंतर त्याची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आहे.

करेली येथील चाच गली येथे राहणाऱ्या नराधम आरोपी बापाचे नाव पप्पू जयस्वार असे होते. तो दारूच्या नशेत असायचा, भाजी विकून घरचा सर्व खर्च मोठा मुलगा प्रियांश करत होता. शुक्रवारी रात्री आरोपीने भयंकर कट रचला. त्याने घरात बनवलेल्या पास्तामध्ये विषाच्या गोळ्या मिसळल्या, पास्ता खावून प्रियांश घराच्या छतावर झोपी गेला. 4 ते 5 वाजताच्या दरम्यान पप्पूने डोक्यावर जड वस्तूने हल्ला केला आणि नंतर त्याला एका खोलीत नेत त्याचा गळा चिरला.

आरोपीच्या डोक्यात मुलाचं आणि बायकोचं अनैतिक संबंध सुरु असल्याचा संशय होता. मृत तरुणाच्या आईने रडत सांगितलं की, नवरा पप्पू सारखा वाद लावायचा. धाकट्या मुलाने खुलासा करत सांगितलं की, त्याचा बाप सतत म्हणालायचा की, मम्मी खिडकी लावून मुलासोबत काय करते? कुटुंबाचं म्हणणं असं की, आरोपी पूर्ण वेडा झाला आणि केवळ दुष्ट विचारांमुळे त्याने आपल्याच मुलाचा खून केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर वडिलांनी आपल्या इतर लहान मुलांना एका खोलीत कोंडून ठेवले आणि बाहेरून कुलूप लावलं. त्याने कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. मात्र, मुलांनी हिंमत करत शेजाऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी कुलूप तोडले असता, संपूर्ण खोली रक्ताने माखली होती.

या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!