April 20, 2026 10:47 am

आंबेगाव कॉलेज रोड व धबाडी भागातील पाणी समस्येवर तातडीची पाहणी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आंबेगाव कॉलेज रोड परिसर तसेच धबाडी भागात सध्या पिण्याच्या पाण्याची अतिशय गंभीर समस्या निर्माण झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेत श्री. रोहिदास बापू चोरघे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली.

 

या पाहणीसाठी सौ. फफाळे तसेच मुकादम जाधव साहेब यांना बोलावण्यात आले होते. प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत पाणीपुरवठ्यातील अडचणी, दाबाची समस्या, लाईनमधील संभाव्य बिघाड तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन दूरदृष्टी ठेवून कायमस्वरूपी उपाययोजना कशा करता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी श्री. रोहिदास बापू चोरघे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपायांसोबतच दीर्घकालीन नियोजन करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना नियमित, पुरेशा दाबाने व वेळेत पाणी मिळावे, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने राबवण्याचे निर्देश देण्यात आले.

 

या तातडीच्या हस्तक्षेपामुळे लवकरच पाणीपुरवठा समस्या नियंत्रणात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!