April 23, 2026 10:34 pm

पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाकडून निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शक करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला आहे. महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही. आनंदाच्या क्षणीच कडवट सांगितलेलं बरं असतं. महापालिकेत कुठल्याही पद्धतीने उन्माद, पारदर्शकतेचा अभाव मी कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाकारले, असे मी म्हणणार नाही. उलट मी म्हणेन, पुणेकरांनी भाजपला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि आमच्या नेत्यांना स्वीकारले, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवारी, ता १७) पुण्यात बोलताना म्हटलं आहे.

 

तर पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईचा महापौर कोण, किती वर्ष असेल या सगळ्या गोष्टी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही ठरवू, त्यामध्ये वाद येणार नाही. आम्ही महापालिका छान पद्धतीने चालवून दाखवू” असा विश्वासही देखील त्यांनी व्यक्त केला.

 

‘पुणे ग्रँड टूर २०२६’ या सायकल स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी अजित पवारांना नाकारले का? हा प्रश्न उपस्थित केला असता या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना म्हटलं की, पुणेकरांनी अजितदादांना नाकारले नाही तर भाजपला व पंतप्रधानांना स्वीकारले, असे म्हणत पुण्याची जनताच येथील दादा आहे, असे नमूद केले. ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आम्हाला मोठा विजय मिळाल्याचा आनंद आहे.त्यामुळे आम्हाला जास्त काम करावे लागेल. महापौर निवड झाल्यानंतर आम्ही मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या संदर्भात अनेक आरोप झाले, चर्चा झाल्या. मात्र, निकालाने त्या सगळ्यांना पूर्णविराम मिळाला आहे, असंही फडणवीसांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

पुण्यामध्ये इतर पक्षातील नगरसेवकांना पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “आम्ही ज्या लोकांना पक्षात घेतले, त्यांची संख्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त नाही. अजित पवार यांच्याबद्दल आमदार महेश लांडगे यांनी तुमच्याकडे तक्रार केली का, या प्रश्नावर ते म्हणाले, आमचे नेते सक्षम आहेत, त्यामुळे ते कुणाकडे कुणाचीही तक्रार करत नाहीत.

 

विरोधी पक्षाला विचारायला हवे

राज्यात विरोधक राहणार की नाही? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्ष राहणार की नाही, हे सत्ता पक्षाला विचारण्याच्या ऐवजी, विरोधी पक्षाला विचारले पाहिजे की, ज्या दिवशी विरोधी पक्षात जातो, त्या दिवशी जनतेचे प्रश्न समजून घ्यावे लागतात, त्यांच्यासाठी काम करावे लागते. घरी बसून कुठलाही विरोधी पक्ष तयार होत नाही. राज ठाकरे यांना युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही, मात्र मनसेचा फायदा उद्धव ठाकरे यांना झालेला दिसतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

महानगरपालिकेत जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठे कोणी नाही

पक्ष जो ज्यांना जबाबदारी देईल त्यांनी पारदर्शक कारभार करायचा आहे, महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही, महापालिका आपला व्यवसाय नाही, सामाजिक आर्थिक परिवर्तन म्हणून आपण हातात घेतलेला आहे. तशाच प्रकारचा व्यवहार महानगरपालिकेमध्ये सर्वांकडून अपेक्षित असे मुख्यमंत्री म्हणाले. आनंदाच्या क्षणीच कडवट सांगितलेलं बरं असतं महापालिकेत कुठल्याही पद्धतीने उन्माद, पारदर्शकतेचा अभाव मी कुठल्याही पद्धतीने सहन करून घेणार नाही, कोणी कितीही मोठा असला तरी महानगरपालिकेत जनतेने दिलेल्या बहुमतापेक्षा मोठे कोणी नाही. जर लोकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहण्याचा आपल्याला अधिकार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

पुणेकरांच्या पात्रतेला आपण पात्र ठरलो तर पुढचे 25 वर्ष आपल्याला कोणी हलवणार नाही

एवढा बहुमत मिळतो तेव्हा आनंद होतोच. दुसरीकडे जबाबदारही वाढतात, प्रचंड मोठ्या अपेक्षेने पुणेकरांनी आपल्याला बहुमत दिलं आहे. जर त्यांच्या पात्रतेला आपण पात्र ठरलं तर पुढचे 25 वर्ष आपल्याला कोणी हलवू शकणार नाही. जर पुणेकरांच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही तर हा विजय लाटेसारखा निघून जाईल. कुठल्याच विजयानंतर मोदीजी शांत बसत नाहीत, लगेच पुढच्या पाच वर्षाचे विकासाचं व्हिजन तयार करतात आपल्यालाही पुण्याच्या विकासाचे नियोजन करायचे आहे. महापौर स्टँडिंग समिती अध्यक्ष सभागृहनेते समित्या सगळ्या नेमल्या जातील. मात्र माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की यामध्ये कुणाला यावर्षी संधी मिळेल कोणाला पुढच्या वर्षी संधी मिळेल मात्र पुणेकरांनी दिलेलं बहुमत महत्त्वाचं आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. पुणे महापालिकेतील पद घेण्या देण्यावरुन जर चर्चा झाली तर पुणेकर आपल्याला माफ करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.

पुणेकरांना जे आश्वासन दिले आहे ते येत्या दोन वर्षातच आपल्याला काम सुरू झालेला दिसेल. राज्याचे सरकार आणि केंद्राचे सरकार पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. देशातील एक नंबरची महापालिका झाली पाहिजे असं आपण सगळे काम करु असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!