राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मोठ्या प्रमाणावर मतदान पार पडलं आहे. सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान नागरिकांना मतदान करण्यात आलं. एकूण 2,869 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र होते. मतदानासाठी राज्यभर 39,092 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी एकूण 15,908 उमेदवार रिंगणात आहेत.सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसत आहे. पुण्यातील काही प्रभागांमध्ये मतदान यंत्रणा (ईव्हीएम) बंद पडल्याचे आढळले. असेच चित्र राज्याच्या इतर भागातही दिसत आहे. राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना शांततेत मतदान करण्याचे आवाहन केले आहे आणि संबंधित तक्रारींची नोंद घेऊन त्वरित कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
बृहन्मुंबई महानगरपालिका : ४१.०८ टक्के
पुणे : 39 टक्के
ठाणे -41 टक्केवारी
पिंपरी चिंचवड – 40.05 टक्के
कोल्हापूर – 50.85 टक्के
इचलकरंजी : 46.3टक्के
नागपूर : ३७.१९ टक्के
सोलापूर : ४०. ३९ टक्के
अकोला : 43.35 टक्के
धुळे : 36.49 टक्के
परभणी : 49.16%
इचलकरंजी : ४६.२३ टक्के
जालना : 45.94 टक्के
नांदेड : 41.65 टक्के
अहिल्यानगर : 48.49 टक्के











