April 24, 2026 12:02 am

मतदान करताना फोटो काढणे पडले महागात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्यभरात महापालिका निवडणुकींसाठी मतदान पार पडत आहे. राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होत आहे. यावर्षाची महापालिका विशेष आहे. कारण अनेक ठिकाणी 3 ते 5 वर्षांनी निवडणूक पार पडत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली बघायला मिळाली. सत्ताधारी प्रमुख तीन पक्षांची देखील सर्वच ठिकाणी युती झाली नाही. खूप मोजक्या ठिकाणी तीनही पक्षांची युती झाली किंवा दोन विरुद्ध तिसरा आणि त्यांच्याविरोधातही इतर अशी लढत होताना दिसली. या निवडणुकीत नियम पाळणे जास्त आवश्यक आहे. कारण प्रचाराची वेळ संपल्यानंतरही प्रचार केला तर तो गुन्हा ठरतो. तसेच नियमाविरुद्ध इतर कृती केली तर त्याचा फटका बसतो. चुकीच्या कृतीविरोधात थेट गुन्हा दाखल होता. पिंपरी चिंचवड शहरात माजी महापौरांच्या पतीच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

निवडणुकीत विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह असणं हे सर्वसामान्य आहे. पण असं असलं तरीही आपण उत्साहात चुकीचं कृत्य तर करत नाही आहोत ना याची शहानिशा करणं आवश्यक आहे. कारण अतिउत्साहात काहीतरी विपरीत देखील घडू शकतं. पिंपरी चिंचवडमध्ये माजी महापौरांच्या पतीला अतिउत्साह अंगाशी आला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर अपर्णा डोके यांचे पती निलेश डोके यांनी मतदान करताना थेट ईव्हीएमच्या चिन्हा समोरील बटन दाबतानाचा फोटो काढला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर अपर्णा डोके यांना बहुमताने विजयी करा, असंदेखील लिहिलं. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली. यानंतर आता पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी निलेश डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे निलेश डोके यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!