May 14, 2026 8:48 pm

महेश शिंदेंचा देसाईंवर पलटवार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेना शाखा आणि संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला दांडी मारली. त्यावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी महेश शिंदे यांच्याबाबत कटु निर्णय घ्यायची वेळ आली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं म्हटलं होतं.

त्याला आमदार महेश शिंदे यांनी प्रत्युतर दिले आहे.महेश शिंदे (Mahesh Shinde) म्हणाले, ज्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला बोलावतील, त्या दिवशी मी जाणार. माझी भूमिका मी एकनाथ शिंदे यांच्यासमोर याअगोदरही मांडली आहे आणि आताही मांडू शकतो, त्यामुळे शिंदेसाहेबांना मी डायरेक्ट बोलू शकतो.

माझ्या जवळच्या लोकांना माझ्याविरोधात उभं करण्याचं काम सुरू आहे, असं मला अजिबात वाटत नाही. पालकमंत्री शंभूराज देसाई हे शिवसेना पक्ष वाढविण्याचे काम करत आहेत. त्यांना माझं सहकार्यच राहणार आहे. तसेच, संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत. आम्ही एकत्र काम करतो, त्यामुळे आम्ही बसून ठरवू, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, कोरेगावात माझे कार्यकर्ते म्हणजे महायुतीचे कार्यकर्ते आहेत. सगळे कार्यकर्ते आजच्या मेळाव्याला उपस्थित होते. काही जण अडचणीमुळे आले नसतील, त्यांच्याशी बसून चर्चा करू.

आमच्यात कुठलाही संघर्ष वाढलेला नाही, हा मीडियाने वाढवलेला संघर्ष आहे. कसलाही संबंध येत नाही. एकनाथ शिंदे हे अत्यंत मोठे नेते आहेत. त्यामुळे आम्ही काय बोलावं, असं काही नाही, असेही महेश शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमदार शिंदे म्हणाले, माझे काल पूर्वनियोजित ६८ कार्यक्रम होते. त्यात ४२ लग्न, १६ सभा होत्या, त्यामुळे माझं शेड्युल्ड पॅक होतं. याशिवाय त्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन कार्यक्रमाचा कोणताही निरोप नव्हता. शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा प्रश्नच येत नाही. राजकारणात स्वत:च्या पद्धतीने जात असतो. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा असतो, मोठं व्हायचं असतं.

आमच्यासोबत असलेल्या चार ते पाच जणांनी कधीच माझं काम केलेले नाही. शेवटच्या दिवशी पैसे घेऊन विरोधकाचे काम त्यांनी केलेले आहे. शिवसेनेत घेतलेल्या चार ते पाच जणांनी कधीच माझं काम केलेले नाही. मागील निवडणुकीतही ते आमच्याबरोबर नव्हते, त्यामुळे मी त्याला फार किमत देत नाही, असेही महेश शिंदे यांनी सांगितले.

ते म्हणाले, मी काय ताम्रपट घेऊन राजकारणात आलेलाे नाही. मी चांगलं काम केलं, तर लोक मला पुन्हा निवडून देतील आणि नाही केल तर घरी बसवतील. मी फार त्या गोष्टींचा विचार करत नाही. माझ्या हातात साडेतीन वर्षे आहेत, तोपर्यंत काम करत राहणार, एवढं मात्र नक्की.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!