April 21, 2026 11:02 pm

*’ड्रग्जचा वापर, 30-40 तरुण…’, निर्मला नवलेंनी पराभवाचं खापर कशावर फोडलं?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पंचायत समितीच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. सोशल मीडियावर फेमस असणाऱ्या निर्मला नवले यांच्या पराभवाची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.आता या सगळ्यावर स्वत: निर्मला नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. शिवाय पराभवाबाबत मनातील खदखद बाहेर काढली आहे.

माझा पराभव अनपेक्षित होता. पण आजच्या निवडणुकीत पैसा जिंकला, बोगस मतदान जिंकले व माणूस हरला. असं असलं या निवडणुकीत विरोधकांकडून तरुण जास्त काळ कार्यरत रहावी, यासाठी दारू आणि ड्रग्जचा वापर करण्यात आला. तरुण पिढी पिढी ड्रगच्या आहारी गेली असून तरुण पिढी बरबाद होत आहे, असा खळबळजनक दावा शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव गणातून पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या रीलस्टार निर्मला नवले यांनी केला आहे.

निर्मला नवले नेमकं काय म्हणाल्या?

पराभवावर प्रतिक्रिया देताना निर्मला नवले म्हणाल्या, “माझा ३०० मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी अनपेक्षित होता. निवडणुकीत पैशांचा अतिवापर होऊन देखील, ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्यांची मी अत्यंत ऋणी आहे. या निवडणुकीत पैसा जिंकला. बोगस मतदार जिंकले आणि माणूस हरला, हे कटू पण वास्तव सत्य आहे. माझ्या गणातील काही मतदार पैशांसाठी पुढील पाच वर्षांसाठी विकला गेला. ही भावना माझ्यासाठी खूप वेदनादायी आहे. या निवडणुकीत विरोधकांकडून दारुसोबत ड्रग्जचाही मोठ्या प्रमाणात वापर केला.”

“निवडणुकीत तरुण कार्यकर्ते अधिक कार्यरत राहावेत, रात्रभर जागे राहावेत, यासाठी ड्रग्जचा अतिवापर करण्यात आला. याचा गंभीर परिणाम येत्या काळात दिसून येणार आहे. ३०-४० तरुण ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. तरुण पिढी अशी बरबाद होणं, माझ्यासाठी चिंताजनक आहे. आजच्या राजकारणात विकासकामं, लोकांची सुख दु:ख, वैयक्तिक प्रश्न, पक्षनिष्ठा, व्यक्तीनिष्ठा याला कोणतीही किंमत उरलेली नाही” असंही नवले म्हणाल्या.

“दुर्दैवाने आज कोणता उमेदवार जास्त पैसा वाटतो, हेच निकष ठरले आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती अशी झाली आहे की, ज्याला राजकारण करायचं आहे, त्याने आधी पैसा कमवावा, निवडणुकीत तो वापरावा, जिंकून यावं आणि नंतर पुढील पाच वर्षे जनतेकडं पाठ फिरवावी. ज्याला राजकारण करायचं नाही, त्यांनी कुटुंबाकडं लक्ष द्यावं, घर बघावं, कुटुंबाला वेळ द्यावा,” असा सल्लाही नवले यांनी दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!