April 21, 2026 9:40 pm

*पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाला संपवले;

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

नवी मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराने आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह १९१ किलोमीटर लांब नेऊन एका विहिरीत फेकून दिला.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावात हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

विहिरीत आढळला जळालेला मृतदेह

खंडाळा तालुक्यातील सुखेड येथील एका शेतातील विहिरीत एका पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. लोणंद पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात हा मृतदेह सोमनाथ बोबडे या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले. अवघ्या तीन दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आणि तपासाचे धागेदोरे थेट नवी मुंबई पोलीस दलापर्यंत पोहोचले.

संशयाचं भूत अन् हत्येचा कट

या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू भिसे हा नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. भिसे हा कळंबोलीतील रोडपाली परिसरात राहतो. सोमनाथ बोबडे हा त्याच्या परिचयाचा होता, मात्र सोमनाथचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय भिसेला होता. याच संशयातून त्याने सोमनाथचा काटा काढण्याचे ठरवले. ५ फेब्रुवारी रोजी भिसे याने आपल्या विजय पवार, किरण गायकवाड आणि श्रीनिवास लोणे या मित्रांच्या मदतीने सोमनाथला एका बहाण्याने बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून त्याचा गळा दाबून खून केला.

पुढच्या सीटवर बसवला मृतदेह अन्…

हत्येनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अतिशय थरारक पद्धतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने सोमनाथचा मृतदेह कारच्या पुढच्या सीटवर एखाद्या जिवंत माणसासारखा बसवला आणि स्वतः कार चालवत १९१ किलोमीटरचा प्रवास केला. सुखेड गाठल्यानंतर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकला आणि ओळख पटू नये म्हणून तो जाळण्याचा प्रयत्न केला.

सीसीटीव्ही आणि कारने उघडले गुपित

लोणंद पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पुण्याच्या दिशेने जाणारी एक संशयास्पद कार आढळून आली. या कारचा माग काढत पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. हवालदार बंडू भिसे याने अटक झाल्यानंतरही गुन्हा कबूल करण्यास टाळाटाळ केली, मात्र त्याच्या साथीदारांनी पोलिसांसमोर पोपटासारखे सर्व सत्य सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!