रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये तीन मृतदेह आढळून आले आणि दिल्लीतील पीरागढी उड्डाणपूल परिसरात खळबळ उडाली. एक महिला आणि दोन पुरुषांचे कारमध्ये होते.
त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला आणि त्यांचे एकमेकांशी काय संबंध होते? असे प्रश्न पोलिसांसमोर होते. त्यातील काही प्रश्नांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिल्ली पोलिसांना रविवारी (८ फेब्रुवारी) दुपारी कॉल करून याबद्दलची माहिती दिली गेली होती. ३.५० वाजता नियंत्रण कक्षात कॉल करून सांगण्यात आले की, कारमध्ये तीन व्यक्ती असून, ते कोणताही प्रतिसाद देत नाहीये. रणधीर, शिवनरेश आणि लक्ष्मी देवी अशी मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणात पोलिसांना कोणती माहिती मिळाली?
तिहेरी मृत्यू प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कारमध्ये दोन पुरुषांमध्ये मृतदेह सापडलेल्या लक्ष्मीची शिव नरेश यांच्यासोबत ओळख होती. दोघांचेही जवळचे संबंध होते. शिव नरेश आणि रणधीर हे मागील ६ वर्षांपासून सोबत प्रॉपर्टीचे काम करत होते.
कारमच्या मागच्या सीटवर शिव नरेश याचे हेल्मेट आणि ट्रॅक सूट पोलिसांना मिळाला. पण, त्याची मोटारसायकल कुठे आहे, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. शिव नरेश हा मूळचा उत्तर प्रदेशातील एटा रहिवासी आहे.
रणधीर आणि शिव नरेश हे दोघे दिल्लीत रणहोला परिसरात राहायला होते. लक्ष्मी जहांगीरपुरी भागात राहत होती. ज्या कारमध्ये तिघांचे मृतदेह मिळाले, ती कार रणधीरची असल्याचे पोलिसांनी सांगितले
कारमध्ये डोकावताच अधिकारी हादरले
रविवारी माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी कारमधील दृश्य बघितले आणि हादरले. रणधीर सिंह (७६ वर्ष), शिवनरेश सिंह (४७ वर्षे) आणि लक्ष्मी देवी (४० वर्षे) या तिघांचे मृतदेह कारमध्ये पडलेले होते.
पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली, तेव्हा कारमध्ये काही सामानही मिळाले. सॉफ्ट ड्रिंकची बॉटल, हेल्मेट, रुमाल आणि ट्रॅक सूट इत्यादी साहित्य पोलिसांनी जप्त केले. या तिघांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज बघणे सुरू केले आहे.











