April 23, 2026 5:26 pm

*तिरुपती प्रसादम लाडूत बाथरूम क्लिनर केमिकल्सयुक्त तुपाचा वापर – चंद्राबाबू नायडूंचा दावा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात भाविकांना वाटण्यात येणाऱ्या लाडूंवरील वाद अजूनही सुरूच आहे. आता मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याप्रकरणी एक खळबळजनक दावा केला आहे, की जगन मोहन रेड्डी सरकारच्या काळात लाडू बनवण्यासाठी वापरले जाणारे तूप बाथरूम क्लिनर केमिकल्सने भरलेल्या तुपापासून बनवले जात होते.

चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे की, जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात तिरुपती मंदिराचे लाडू बाथरूम क्लिनर केमिकल्सने भरलेल्या तुपापासून बनवले जात होते.

मुख्यमंत्री नायडू यांनी वायएसआरसीपीवर प्रसादात भेसळ करून श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराच्या पावित्र्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. नायडू म्हणाले, पाच वर्षांपासून त्यांनी रासायनिक प्रक्रिया केलेल्या तुपाचा वापर करून गोविंदाचा प्रसाद तयार केला. हे तूप बाथरूम क्लिनरसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांपासून बनवले जात होते.

मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा दावा आहे की, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि विशेष तपास पथकाने त्यांना क्लीन चिट दिली आहे, परंतु त्यांचे काका, वाय.व्ही. सुब्बा रेड्डी, जे तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी)चे अध्यक्ष होते, त्यांनी स्वतः प्रसादात भेसळ केल्याचे कबूल केले आहे. जगन मोहन रेड्डी यांनी टीटीडीला भेसळयुक्त प्रसादाने अपवित्र केल्यानंतर परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. पूर्वी आणि आता दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये लक्षणीय फरक आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!