April 23, 2026 4:43 pm

*वर्षभरात किती विमानांमध्ये उद्भवला बिघाड? ; मंत्री मोहोळ यांनी लोकसभेत आकडाच सांगितला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देशातील विमानांमधील तांत्रिक दोषांबाबत लोकसभेत उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, जानेवारी २०२५ पासून ३७७ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक दोष आढळले आहेत.

मोहोळ यांनी स्पष्ट केले की ही विमाने देशातील विविध नियमित विमान कंपन्यांची आहेत.

तसेच, त्यांनी लोकसभेला माहिती दिली की भविष्यात कर्मचाऱ्यांची कमतरता टाळण्यासाठी, विभागाची पुनर्रचना करण्यात आली आहे आणि डीजीसीएमध्ये तांत्रिक पदांची संख्या आता १ हजार ६३ करण्यात आली आहे. जी यापूर्वी, २०२२ मध्ये, तांत्रिक पदांची संख्या ६३७ होती.

डीजीसीएने ७ जुलै २०२५ रोजी एक नवीन परिपत्रक जारी केले. याअंतर्गत, सर्व देखरेख, उणीवांचा अहवाल (CA-2001) आणि कारवाईशी संबंधित सर्व कामे आता eCA पोर्टलद्वारे केले जाईल. त्यांनी स्पष्ट केले की यामुळे विमान तपासणी आणि कारवाईच्या संपूर्ण प्रक्रियेचे रिअल-टाइम ट्रॅकिंग शक्य होईल.

याचबरोबर डीजीसीएने अनेक अनियोजित देखरेखीचे उपाय केले, ज्यात ८७४ स्पॉट चेक आणि ५५० नाइट सर्विलान्स तपासण्यांचा समावेश होता. हे पूर्वसूचना न देता विमान वाहतूक आणि देखभाल पद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी होते.

तर डीजीसीएमधील मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत, सरकारने सांगितले की मंजूर तांत्रिक पदांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. २०२२ मध्ये, डीजीसीएकडे ६३७ मंजूर तांत्रिक पदे होती. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी आणि नियामक देखरेख मजबूत करण्यासाठी, पुनर्रचना प्रक्रियेमुळे तांत्रिक पदांची संख्या १,०६३ पर्यंत वाढली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!