April 20, 2026 4:19 am

अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कुठे आणि कसा झाला?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिली आहे.

विमानाचा अपघात नेमका कुठे आणि कसा झाला?

अजित पवार कॅबीनेटच्या बैठकीसाठी ते मुंबईत आलेले होते, त्यानंतर आज  मुंबई टेक ऑफ टाइमिंग सकाळी ८.१० वाजता मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात असताना विमान तांत्रिक कारणामुळे धावपट्टीवरून बाजूला गेल्याची माहिती मिळत आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात आदळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

विमानात कोण कोण होते? 

*खाजगी VSR कंपनीचे विमान*

1. माननीय अजित दादा पवार साहेब

2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव

3. पायलट कॅप्टन सुमित कपूर

4. कॅप्टन संभवी पाठक

5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

बचाव व मदतकार्य

जखमी असल्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली.

घटनास्थळी अॅम्ब्युलन्स, अग्निशमन बंब व आपत्कालीन पथके तैनात ठेवण्यात आली आहेत.

प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.

तपासाची दिशा

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) व संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरू आहे.

तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल किंवा मानवी चूक यांसह सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे.

अजित पवारांच्या अकाली जाण्याने राज्याला मुळापासून हादरा-

अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिलं गेलं आहे. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!