April 20, 2026 1:06 am

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. Learjet 45 प्रकारच्या या विमानातून प्रवास करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचं डीजीसीएनं स्पष्ट केलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अजित पवार हे संबोधित करणार होते. मात्र लँडिंग करताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा घटनास्थळाकडं रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्या भगिनी खासदार सुप्रिया सुळेसुद्धा दिल्लीहून बारामतीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.

विमानाला लँडिंगदरम्यान अपघात :

 सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी विमानाचं उड्डाण झालं. त्यानंतर तासाभरातच हा भीषण अपघात झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीत येत असताना त्यांच्या विमानाला लँडिंगदरम्यान अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातानंतर विमानाला आग लागल्याचंही वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत येत होते. काल कॅबिनेट बैठक आटोपल्यानंतर आज सकाळी ते विमानानं बारामतीकडं रवाना झाले होते. याच वेळी बारामती विमानतळावर लँडिंग करताना हा अपघात झाला. या विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षकही उपस्थित होते. अपघाताची माहिती मिळताच बारामती अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने विमानतळाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती आहे.

अपघातस्थळी आढळले तीन मृतदेह :

 “बारामतीत लँडींग करताना विमानाचा अपघातात झाला आहे. या अपघातात विमानाचं मोठं नुकसान झालं आहे. या विमान अपघातातील घटनास्थळावर तीन मृतदेह आढळून आले आहेत. मात्र मृतदेहाची अद्यापही ओळख पटली नाही. हे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती पुण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप सिंह गील यांनी दिली.

अजित पवार यांच्या आज 4 नियोजित सभा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज बारामती जिल्ह्यात चार नियोजित सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी अजित पवार हे सकाळीच मुंबईवरुन बारामतीकडं निघाले होते. मात्र सकाळी 08.45 वाजता लँडींग करताना त्यांच्या विमानाला अपघातात झाला. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!