July 27, 2026 4:38 pm

पोलीसच झाले दरोडेखोर! एक कोटींच्या दरोड्यात दोन पोलीस कर्मचारी सहभागी; तोतया पत्रकारासह १० जणांविरुद्ध गुन्हा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : सिंहगड रस्ता परिसरात एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्री यांचा सहभाग उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तोतया पत्रकार आशिष तिवारीसह एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तपासानुसार, व्यावसायिकांकडील एक कोटी रुपयांची रोकड हस्तांतरित होत असताना आरोपींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत धमकावून दरोडा टाकला. झटापटीदरम्यान मिरची पावडर फेकण्यात आली, तर काही रक्कम घेऊन एक व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाली.

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणातील सहा आरोपी, त्यात दोन्ही पोलीस कर्मचारीही, अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!