June 5, 2026 10:23 am

एकाच वेळी 12 जणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, अशातच गावातला एक तरुणाचा साखरपुडा होता, त्यासाठी नातेवाईक आणि गावातील गावकरी मोठ्या उत्साहाने तरुणाच्या साखरपुड्याला जाण्यासाठी निघाले पण नियतीच्या मनात काही तरी वेगळं होतं.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काळ बनून आलेल्या कंटेनरने एका दुचाकीला चिरडलं आणि नंतर वऱ्हाड्यांचा टेम्पोला धडकला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. आज शोकाकुल वातावरणात गावात १२ जणांना साश्रू नयनाने अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी गावकऱ्यांचा आक्रोश काळजी पिळवटून टाकणारा होता.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमवारी झालेल्या धानिवरी येथील अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला होता. आज सकाळी बापूगावामध्ये मयत झालेले १२ पार्थिव आणण्यात आले. . बापूगाव येथील लखनपाडा इथं १२ पार्थिवक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यावेळी मयतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश काळजी पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर 12 मृतदेहांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. गावामध्ये पहिल्यांदाच एकाच वेळी १२ जणांवर अत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं. २४ तासांपूर्वी मोठ्या उत्साहाने सगळे जण साखरपुड्यासाठी निघाले होते, पण, अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

डहाणूच्या बापूगाव येथून हे वऱ्हाडी धानिवरी येथे साखरपुड्यासाठी येत होते. मात्र एक किलोमीटरचा वळसा घालून न येता या वऱ्हाडाच्या टेम्पो चालकाने आऊटसाईडने टेम्पो नेण्याचा प्रयत्न केला आणि गुजरातहून मुंबईकडे येणारा एक भरधाव कंटेनर दुचाकीस्वाराला चिरडून थेट या वऱ्हाडाच्या टेम्पोवर पलटी झाला. कंटेनर आणि टेम्पोखाली चिरडून बारा जणांचा मृत्यू झाला. तर 25 पेक्षा जास्त वऱ्हाडी सध्या गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह पालघरचे स्थानिक खासदार आणि जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. 17 जखमींवर अजूनही डहाणूच्या धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना उपचारादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही यासाठी आदिवासी विकास विभाग त्यांचं पालकत्व स्वीकारत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत तातडीने मदत जाहीर केल्याच उईके यांनी सांगितलं. तसंच जखमींच्या कुटुंबीयांना रुग्णालय ते गाव असं ये जा करण्यासाठी तसंच त्यांच्या राहण्याची पूर्ण व्यवस्था आदिवासी विकास विभाग करत असून आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन देखील यावेळी उईके यांनी दिलं.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!