अजित पवार मृत्यू प्रकरणातही अशोक खरातची सविस्तर चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंदली दमानिया यांनी केलीय. अजित पवारांच्या अपाघाती मृत्यूच्याआधी सहा दिवसात अशोक खरातनं 4 फोन बदलल्याची माहिती आहे.
त्यामुळे अजित पवारांच्या मृत्यूचा संबंध खरातशी असल्याचा संशय असून या प्रकरणी खरातची चौकशी करा, अशी मागणी अंजयली दमानिया यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. अपघात की घातपात याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान अंजली दमानिया यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सीडीआर आणि एआयच्या मदतीने ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक हँडसेट फक्त 19 मिनिटांसाठी एका फोन कॉलसाठी बदलल्याचाही दावा दमानिया यांनी केला आहे. . खरातनं फोन हा सर्विलान्सवर असल्याच्या भीतीनं हॅन्डसेट बदलले असण्याची शक्यता दमानिया यांनी वर्तवली आहे.
जानेवारी मध्ये खरातने त्याचे पाच वेळा फोन बदलले. 21 ते 31 जानेवारी दरम्यान त्याने फोन बदलले आहे. त्याच महत्त्वाचे म्हणजे 27 जानेवारी ते 31 जानेवारी त्याने एक फोन वापरला जो त्याने पुन्हा कधी वापरला नाही. इतर चार फोन त्याने अजित पवारांच्या निधनाच्या वेळी वापरलेला फोन पुन्हा वापरला नाही. खरातनं फोन हा सर्विलान्सवर असल्याच्या भीतीनं हॅन्डसेट बदलले असण्याची शक्यता दमानिया यांनी वर्तवली आहे.
महत्त्वाचं म्हणजे 31 जानेवारीला अशोक खरात नाशिकहून दिल्लीला गेला आणि एअरपोर्टवर मोबाईल बदलल्याचे समोर आले आहे. हे चारही मोबाईल जप्त झाले आहेत की नाही त्या चारही हँडसेटचे फॉरेन्सिककडे पाठण्याची मागणी केली आहे. 28 जानेवारीला (अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी) सर्वाधिक फोन वापरल्याचे देखील अंजली दमानिया यांनी दावा केला आहे. पोलीस यंत्रणेने याचा कसून तपास करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केला आहे. अजित पवारांच्या निधनाशी खरातचा संबध असल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे याचा तपास करावा अशी मागणी केली आहे.











