May 14, 2026 5:11 am

वणवा लावणाऱ्यास पाच हजारांचा दंड

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वणवा लावून वनसंपदेला हानी पोहोचविणाऱ्या एकावर येथील वनविभागाने कारवाई केली.भोसगाव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी मराठवाडी (ता. पाटण) येथील एकावर मध्यंतरीच्या काळात गुन्हा दाखल झाला होता. पाटण न्यायालयाने त्याला पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याबाबतची माहिती अशी; परिसरात वणवे लावण्याचे प्रकार वाढल्याने वनसंपदेचे नुकसान सुरू आहे. डोंगररांगा वणव्यामुळे काळवंडून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने वणवे लावणाऱ्यांवर पथकाद्वारे नजर ठेवून कारवाईची मोहीम उघडली आहे. भोसगाव वनक्षेत्रात वणवा लावल्याप्रकरणी

अनिल पांडुरंग शिंदे (रा. मराठवाडी) याच्यावर वन कायद्यांतर्गत विविध कलमान्वये नुकताच गुन्हा दाखल केला. या घटनेत तीन हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले. प्रसंगावधान राखत वनविभागामार्फत तत्काळ वणवा विझवण्यात आला. संशयितास पाटण न्यायालयाने पाच हजार दंड व दंड न भारल्यास सात दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, वनपाल शशिकांत नागरगोजे, वनरक्षक अमृत पन्हाळे, प्रशांत लव्हटे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. यापुढेही कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!